दोन देशांमध्ये जे युध्द होतं, त्यामध्ये शस्त्रास्त्रांपेक्षा गुप्तहेरांच्या बातम्या खूप मोठी आणि दिशादायी भूमिका निभावत असतात. भारत – पाकिस्तान युध्द असो, की पाकिस्तानच्या कराची शहरावरचा हल्ला असो. या आणि अनेक युध्दजन्य प्रसंगात भारताच्या राॅ अर्थात रिसर्च अँडअॅनॅलिसिसचं Reasearch And Analysis Wing अनन्य साधारण असं महत्व आहे.
खूप कमी लोकांना हे माहित असेल, की भारताच्या ज्या काही देशाबाहेरच्या गुप्तहेर संस्था आहेत, त्या फक्त चीनवर करडी नजर ठेवण्यासाठीच कार्यरत होत्या. मात्र चीनपेक्षा पाकिस्तानचाच भारताला जास्त उपद्रव व्हायला लागल्यापासून भारताच्या ‘राॅ’चं संपूर्ण लक्ष पाकिस्तानवर गेलं.
खरं तर 1962 च्या लढाईच्या सहा वर्षांनंतर चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी राॅ ची स्थापना करण्यात आली. पण पाकिस्तानचं उपद्रव मूल्य वाढल्यानं राॅ ची सर्व शक्ती पाकिस्तानवरच केंद्रीत झाली. अर्थानं पाकिस्तान भारताच्या राॅ या सरकारी गुप्तहेर संस्थेच्या रडारवर आहे.
काश्मिरचा मुद्दा ज्वलंत ठेवण्यासाठी पाकिस्ताननं नाना प्रकारच्या हरकती केल्या. पण भारताची राॅ ही गुप्तहेर संस्था पाकिस्तानला भारी पडली. 1968 च्या आधी भारताची इंटेलिजेन्स ब्युरो IB ही संस्था भारतासाठी गुप्त माहिती गोळा करत होती. परंतू 1962 मध्ये चीनकडून पराभव झाल्यानं दुसरी एक भक्कम गुप्तहेर संस्थेची निर्मिती करावी लागली.
भारताचे मूळ रहिवाशी असलेले 23 वर्षीय रविंद्र कौशिक हे आपल्या देशाचे नामांकित गुप्तहेर आपल्या देशासाठी माहिती काढता काढता पाकिस्तानी सेनेत मोठे अधिकारी झाले होते. पुढे त्यांना मेजर या पदावर बढतीही मिळाली. पाकिस्तानी मुलीबरोबर लग्न करुन ते एका मुलीचे वडीलदेखील झाले होते.
सन 1979 ते 1983 पर्यंत त्यांनी भारताला महत्वाची माहितीदेखील पाठवली होती. त्यांच्या गुप्त हेरगिरीच्या कामगिरीमुळे त्यांना ब्लॅक टायगर Black Taiger म्हटलं जात होतं. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना हे नाव दिलं होतं.
दुर्दैवानं ते पकडले गेले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सन 2001 साली मुलतान जेलमध्ये त्यांचं निधन झालं होतं. मात्र मरेपर्यंत त्यांनी पाक सरकारकडे भारताविरुध्द कधीही तोंड उघडलं नाही.