हॅलो, मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय ! तुमच्या कुरियरमध्ये ड्रग्ज सापडलंय’, असं म्हणत ‘त्या’ भामट्यानं घातला ९१ लाखांना गंडा!

spot_img

हॅलो, मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय ! तुमच्या कुरियरमध्ये ड्रग्ज सापडलंय’, असं म्हणत ‘त्या’ भामट्यानं घातला ९१ लाखांना गंडा!

हल्ली चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, जबरी चोरी, रस्ता लूट असे गुन्हे कमी होत आहेत. मात्र या गुन्ह्यांची जागा आता सायबर गुन्हेगारांनी घेतली आहे. हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या योजना आखून समोरच्याला अक्षरशः मूर्खात काढून त्याची आर्थिक लूट करत आहेत.

असाच एक प्रकार नुकताच पुण्यात उघडकीस आला आहे. या गुन्हेगारांनी एका महिलेला सांगितले, की दुबईहून तुम्हाला एक पार्सल आलं आहे आणि त्यात आठशे ग्रॅम ड्रग्ज सापडलंय. ताबडतोब सायबर पोलिसांना संपर्क करा’.

या गुन्हेगारांनी सदर महिलेला सांगितले की यामुळे तुमचे बँक खाते सील होणार आहे. त्यामुळे आम्ही देत असलेल्या बँक खात्यावर तुमची बँकेत जेवढे जमा असतील तेवढे पैसे या खात्यात टाका.

त्या महिलेने तातडीने वीस लाख रुपये गुन्हेगारांनी दिलेल्या खात्यात टाकले आणि ऐंशी लाखांची एफडी सुद्धा सायबर गुन्हेगारांनी त्या मुलीला तोडायला लावली असे सर्व मिळून 91 लाखांपेक्षा अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी लुटली.

मात्र काही वेळाने हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने सायबर गुन्हेगारांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित महिलेने त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने तोतया पोलीस अधिकाराने सांगितलं, आम्ही चौकशी करत असून, या प्रकरणात तुमचे बँक खाते सील केले जाण्याची शक्यता आहे.

तुमच्या बँक खात्यावरील पैसे तुम्ही दुसर्‍या खात्यावर ट्रान्सफर करा, चौकशी पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतील, असे सांगून त्यांना ३ बँक खाते क्रमांक पाठविले. अशा प्रकारे या महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाली. दरम्यान, यातून तुम्ही आम्ही फार मोठा बोध घेण्याची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :