‘हीच’ व्यक्ती होईल स्वतंत्र नेवासा मतदारसंघाचा भावी आमदार !
अहमदनगर जिल्ह्यातला नेवासे तालुका हा पौराणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. राजकीयदृष्ट्यादेखील नेवासे तालुका हा अत्यंत जागरूक तालूका आहे. या तालुक्याने आतापर्यंत राज्याला अनेक आमदार दिले. आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेवासे तालुक्याचा भावी आमदार कोण, हा मोठा उत्सुकता विषय आहे.
विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. या एक वर्षाच्या कार्यकाळात पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे. अनेक प्रकारची राजकीय स्थित्यंतरे घडणार आहेत. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरूदेखील झाली आहे.
सर्वसामान्यांची निवडणूक ही तारीख म्हणजे इलेक्शन डेट जाहीर झाल्यानंतर सुरू होते. मात्र राजकारणी लोकांची निवडणूक दोन वर्ष आधीच सुरू होते, असं नेहमी म्हटलं जातं. नेवासी तालूका हा पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण याच तालुक्यात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन महान ग्रंथांची रचना केली.
नेवासा तालूका अहमदनगर जिल्ह्यातला महत्त्वाचा तालूका आहे. या तालुक्यात शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड, मोहिनीराज मंदिर अशा तीर्थक्षेत्रांबरोबरच वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं गुण्यागोविंदाने राहत आहेत.
नेवासी तालुक्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आदी विविध पक्षांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी हे कार्यकर्ते स्थानिक प्रशासनाबरोबर अक्षरशः भांडताहेत. गोरगरिबांना मदत करताहेत. अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करताहेत.
आगामी 2024 च्या निवडणुकीत नेवासे तालुक्याचा भावी आमदार कोण होणार, या प्रश्नाचे उत्तर जर द्यायचे ठरले तर हेच सांगता येईल, की जो सर्वांचे प्रश्न ऐकून घेतो, ते सोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. अनेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो, ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे, जो प्रामाणिक आहे, जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करायला त्याची तयारी आहे, अशीच व्यक्ती 2014 चा विधानसभेत नेवासे तालुक्याचा भावी आमदार होईल, यात शंकाच नाही.
ही बातमी तुम्ही मोठ्या उत्सुकतेने वाचल्यास त्याबद्दल तुमचे शतशः आभार. पण ही बातमी देताना स्पष्ट असं उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही, मिळणार नाही आणि आम्हीदेखील ते देणार नाही. कारण सध्याचा महिना हा एप्रिल आहे आणि आपलं या बातमीतून ‘एप्रिल फुल’ झालं आहे, अशी आपली खात्री झाली असेलच. तूर्त इथेच थांबतो, धन्यवाद.