हातात फक्त एक कोरा कागद घेऊन ‘या’ नेत्यानं शांत केलं विधानसभेचं सभागृह ! 

spot_img

हातात फक्त एक कोरा कागद घेऊन ‘या’ नेत्यानं शांत केलं विधानसभेचं सभागृह !

 

अजब वाक्चातुर्य आणि युक्ती लाभलेल्या ‘या’ नेत्याचा ‘हा’ किस्सा एकदा वाचाच !

 

निवडणुकीच्या सभेत दमदार भाषण करणं वेगळं आणि विधीमंडळात विरोधकांच्या प्रश्नांची आत्मविश्वासानं उत्तरं देणं वेगळं असतं. अनेक वेळा सभा गाजविणारे नेते विधानसभेच्या सभागृहात तोंडसुध्दा उघडत नाहीत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सभेच्या मैदानासह विधीमंडळाचं सभागृह गाजविणारे एकमेव नेते होऊन गेले. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे ते राजकीय व्यक्तिमत्व !

 

काँग्रेसला Congress पराभूत करुन भाजप सेनेची Shivsena BJP युती नुकतीच राज्याच्या सत्तेवर विराजमान झाली होती. राज्याच्या शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे होते. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर होती.

 

स्व. बाळासाहेब ठाकरे भुजबळ यांना ‘लखोबा’ म्हणायचे. भुजबळांनी नुकतीच शिवसेना सोडली आणि प्रखर विरोधकाची भूमिका सक्षम आणि आक्रमकपणे वठविली. त्यावेळी विरोधकांनी गृह खात्याच्या कुठल्या तरी प्रस्तावावर चर्चा सुरु केली.

 

तत्कालिन विरोधी पक्ष नेते छगन भुजबळ तावातावानं सत्ताधारी भाजप सेनेवर तुटून पडले होते. भल्या भल्या सत्ताधारी नेत्यांना घाम फुटला. कारण विरोधक या प्रस्तावावर चर्चा करतील, अशी सत्ताधार्‍यांनाही कल्पना नव्हती. त्यावेळी स्व. मुंडे सभागृहात उपस्थित नव्हते.

 

विरोधकांच्या रागाचा पारा चढतच होता. तेवढ्यात तत्कालिन मुख्यमंत्री जोशी यांनी कोणाला तरी मुंडे यांच्यामार्फत सभागृहात येण्याचा निरोप दिला. वेळेचं गांभिर्य ओळखून मुंडे सभागृहात आले. वास्तविक पाहता मुंडे यांनादेखील विरोधकांच्या या भूमिकेची कल्पना नव्हती.

 

मुख्यमंत्री जोशी यांनी मुंडे यांना सर्व प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर मुंडे यांनी त्यांच्या फाईलमधून एक कागद काढला आणि मोठ्या आत्मविश्वासानं विरोधकांच्या सर्वच मुद्यांचं खंडन केलं. विरोधकांच्या प्रश्नांना मुंडे यांनी उत्तरं दिली.

 

यादरम्यान, मुंडे यांनी त्यांच्या हातातला कागद दाखवून ‘माझ्याकडे प्रत्येक विषयांची आकडेवारी आहे’, असं मुंडे म्हणाले. विरोधकांचं समाधान झालं आणि विधानसभेचं सभागृह शांत झालं. अशा प्रकारे मुंडे यांनी मोठ्या चातुर्यानं फक्त एका कागदावर विरोधकांना शांत केलं.

 

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :