स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पात्रताधारक उमेदवारांकरती 4 हजार 500 जागावर मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ( Staff Salection Commission Recruitment for lower Division Clerk & Data Entry Operator )
पदांचे नाव – कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड – A , एकूण पदांची संख्या – 4 हजार 500
अशी आहे यासाठीची पात्रता ! या पदांकरीता अर्ज सादर करणारा उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्षे दरम्याने असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता तीन वर्षे सूट देण्यात येणार आहे.