सोशल मिडियावर महिलांबद्दल अपशब्द ! पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

spot_img

फेसबुक वर एका व्हिडिओद्वारे महिलांबद्दल अपशब्द बोलून तमाम महिला भगिणींचा अपमान केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केलाय. भादंवि 354, माहिती तंत्रज्ञान कलम 67 (अ) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी एका महिलेनं फिर्याद दिलीय. या फिर्यादीत म्हटलंय, की दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता फेसबुकवर एका व्हिडिओत मुलाखत पहात असताना डाॅ. केशव क्षीरसागर यांनी महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं. यामुळे महिलांचा अपमान झाला.

या व्हिडिओतल्या मुलाखतीमुळे समाजात महिलांची प्रतिमा मलीन झालीय. कारण या व्हिडिओत काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलंय. दरम्यान, यासंदर्भात डाॅ. क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सहाय्यकानं सांगितलं, की ज्या व्हिडिओबद्दल पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, त्या व्हिडिओचा आम्ही शोध घेत आहोत. मात्र डाॅ. क्षीरसागर यांचा तसा उद्देश नव्हता.

या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे यांनी सांगितलं, की डाॅ. क्षीरसागर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, डाॅ. क्षीरसागर यांना एका मोर्चाप्रकरणी अटक करण्यात आल्याचं त्यांच्या स्वीय सहाय्यकानं सांगितलं.

महिलांना आदिशक्तीचं रुप मानलं जात असताना महिलांचा सोशल मिडियाद्वारे असा अपमान पुरोगामी राज्याला शोभतो का, याप्रकरणी डाॅ. क्षीरसागर यांनी तमाम महिला भगिनींची माफी मागावी, अशी मागणी महिला संघटनांच्या काही महिला सदस्यांनी केलीय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :