ज्यांच्याकडे लाखो, करोडो रुपये येताहेत, ते एक तर शेअर मार्केट, Share Market, रियल इस्टेट Real Estate किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. मात्र सोन्याच्या किंमती घसरताच असे व्यावसायिक हवालदिल होतात. मागे सोन्याच्या किंमतीत चांगली वाढ झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदार जाम खुष होते. परंतू मागच्या आठवड्यात सोन्याच्या किंमती घसरल्या. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार Envester’s चिंताग्रस्त झाले आहे.
सोन्याचा भाव यापूर्वी 53 हजार 914 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. 2) सोन्याचा भाव 53 हजार 611 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दरम्यान, लग्नसराईमुळे (Wedding Season) सोन्याचा भाव काहीसा वाढला असला तरी मागच्या सोन्याचे भाव अचानक कमी झाल्यानं गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे.
अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराबाबतच्या भूमिकेनंतर सोन्याचे भाव पडतील की वाढतील, हे स्पष्ट होणार आहे. मात्र गेल्या आठवड्यात म्हणजे मागच्या सोमवारी सोन्याची किंमत 53 हजार 972 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. मंगळवारी या भावात घसरण झाली.
सोन्याच्या भावात जवळपास 500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा भाव 53 हजार 461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. बुधवारी भावात थोडी सुधारणा झाली. पण नंतर गुरुवारी आणि शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.
शेअर मार्केट, रियल इस्टेट ही क्षेत्रं बेभरवशाची आहेत. तसंच सोन्यामध्ये गुंतवणूक हीदेखील मोठी जोखीम किंवा रिस्क Reask आहे. मात्र गुंतवणूकदार ती अंगावर घेतात. कारण त्यांना माहित असतं, की बाजारात तेजी, मंदी सुरुच असते. कधी ना कधी तेजी येईल आणि आपल्याला चांगला परतावा मिळेल, अशी आशा गुंतवणूकदारांना असते.
या वर्षी मार्च महिन्यात सोन्याचा भाव सर्वात जास्त होता. सोन्याची किंमत 54 हजार 330 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. हा या वर्षातली सर्वात जास्त भाव होता. त्या तुलनेत अजून सोन्याचा भाव कमी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली.
सध्या सोन्यात तेजीचे सत्र सुरु असले तरी तज्ज्ञांचे मते अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम यावर होऊ शकतो. दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. डॉलरपेक्षा रुपया मजबूत झाला तर सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे सोन्यात लागलीच गुंतवणूक करणे घाईचे होईल,असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.