सोने चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांत पंधरवड्यांपासून घसरण सुरूच ! 

spot_img

सोने चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांत पंधरवड्यांपासून घसरण सुरूच ! 

देशात दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ दिसून आली. भावातील ही सूज इतकी होती की, त्यावर खरेदीदारांना कधी शंका आली नाही की, बाजारातील दिग्गज तज्ज्ञांनी या दरवाढीवर आवाज उठविला. काही दिवसांसाठी सोने-चांदी माघार घेत असली तरी भावाची भरारी अचंबित करणारी होती.

त्याविरोधात ग्राहकांनी, खरेदीदारांनी, गुंतवणूकदारांनी, आर्थिक तज्ज्ञांनी कधीच आवाज उठविला नाही. केवळ चिंता आणि नाराजी व्यक्त केली. सध्या 15 दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र आहे. पण ही वादळापूर्वीची शांतता असल्याचा काहींचा अंदाज आहे.

देशातील सराफा बाजारात (Sarafa Market) सोने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली घसरले आहे. तर चांदी गडगडून 71,000 रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.

परवाच्या शुक्रवारी ( दि. १९) सोने 199 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60275 रुपयांवर पोहचले. तर गुरुवारी सोने 172 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60,474 रुपयांवर पोहचले होते. शुक्रवारी चांदी प्रति किलो 71,784 रुपये तर गुरुवारी हा भाव 71,496 रुपये प्रति किलो होता.

अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक धोरणांमुळे डॉलर पुन्हा मजबूत झाला आहे. तो सातत्याने उच्चांकी दिशेने सुसाट सुटला आहे. दोन महिन्यात डॉलरने जागतिक बाजारात पुन्हा पत उंचावली. डॉलर इंडेक्स दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचला आहे.

24, 23, 22 कॅरेटचा भाव

ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,275 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,034 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,212 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,206 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :