सोने – चांदीच्या भावांत चढ उतार सुरुच !लवकरच चांदीचे दर वाढणार ; म्हणून चांदी खरेदी करा !

spot_img

सोने – चांदीच्या भावांत चढ उतार सुरुच !लवकरच चांदीचे दर वाढणार ; म्हणून चांदी खरेदी करा !

भारतात सोन्या चांदीच्या दागिण्यांना मोठी मागणी असते. विशेषत: लग्नसराईत सोन्या चांदीचे भाव प्रचंड वाढतात. मात्र गेल्या शुक्रवारी (दि. 16) सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, भारतातल्या
सराफ बाजारात अशी चर्चा आहे, की चांदीचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे सध्या कमी भावात असलेली चांदी खरेदी करायला हरकत नाही.

शुक्रवारी (दि. 16) सकाळी 999
शुध्द 10 ग्रॅम सोन्याचा दर 53 हजार 885 रुपये होता. तर 999 शुध्द चांदीचा दर काहीसा घसरला होता. एक किलो शुध्द चांदीचा दर 67 हजारांच्या वर गेलेला होता. तो 66 हजार 307 वर गेला.

शुक्रवारी 995 शुध्द 10 ग्रॅम सोन्याच्या भावातही मोठी घसरण झाली. 54 हजार 244 रुपयांवरुन सोन्याचा 53 हजार 670 रुपयांवर गेला. तर 916 शुध्द 10 ग्रॅम सोन्याचा दर 49 हजार 887 रुपयावरुन 49 हजार 358 रुपयांवर गेला. गेल्या दोन दिवसांत सोन्या चांदीच्या सर्व भावात मोठी घसरण झाली.

दरम्यान, भारतातल्या सराफ बाजारात जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या अनुभवानुसार चांदीचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहेत. त्यामुळे सध्या कमी भावांत असलेली चांदी खरेदी करुन आर्थिक फायदा करुन घ्यायला हवा. 750 शुध्द सोन्याचा भाव 40 हजार 846 रुपयांवरुन 40 हजार 813 रुपयांवर गेला.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :