सैनिकनगर परिसरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा अन्यथा मृत डुकरं ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकणार..!
नगर – भिंगार जवळच असलेल्या केकती-शहापूर ग्रामपंचायत हद्दीत मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या आहे. हे मोकाट डुकरांच्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
हा प्रकार जर असाच चालू राहिला तर व प्रशासनाने या मोकाट डुकरांचा बंदोबस्त केला नाही तर ग्रामसेवकाच्या टेबलावर मृत डुकरं आणून टाकले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.