सामाजिक कार्यकर्ते लॉरेन्स स्वामी यांचे सुपुत्र युवाउद्योजक रोहन स्वामी यांनी पोलीस कल्याण निधीसाठी दिला 51 हजार रुपयांचा धनादेश!

spot_img

सामाजिक कार्यकर्ते लॉरेन्स स्वामी यांचे सुपुत्र युवाउद्योजक रोहन स्वामी यांनी पोलीस कल्याण निधीसाठी दिला 51 हजार रुपयांचा धनादेश!

पोलीस कर्मचारी बांधव हे तुमच्या आमच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस घराबाहेर असतात. सतत ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठीसुद्धा वेळ नसतो. पोलीस कर्मचारी सतत रस्त्यावर आहेत म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. याच भावनेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी काही तरी करावं, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते लॉरेन्स स्वामी यांचे सुपुत्र रोहन स्वामी यांनी पोलीस कल्याण निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश दिला.

रोहन स्वामी यांनी हा धनादेश महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्याकडे नुकताच प्रदान केला. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी या निधीचा सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते लॉरेन्स स्वामी यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रोहन स्वामी यांनी पोलीस कल्याण निधीसाठी हा धनादेश दिला.

रोहन स्वामी यांच्या या निर्णयाचं अनेक ठिकाणी कौतूक होत आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, की ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि पोलीस कर्मचारी बांधव हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच समाजात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहते.

तुमच्या आमच्या माता भगिनींचं संरक्षण करण्याचं काम पोलीस कर्मचारी अहोरात्र करत असतात. समाजात शांतता रहावी, यासाठी पोलीस कर्मचारी स्वतःच्या घरापासून कित्येक तास बाहेर राहून तुम्हाला आम्हाला संरक्षण देत असतात.

या पोलीस कर्मचाऱ्यांची घरची आर्थिक परिस्थिती, त्यांची घरं, त्यांच्या मुलांची शिक्षणं, त्यांच्या घरातल्या वयोवृद्ध मंडळीचं आजारपण यासाठी तुमच्या माझ्या पोलीस कर्मचारी बांधवाला कर्ज काढावे लागतं. मिळणाऱ्या पगारातून कर्जाचे हप्ते फेडता फेडता पोलीस कर्मचाऱ्याला नक्की नऊ येतात. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडीशी मदत करावी, या विचारातूनच पोलीस कल्याण निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश देण्याचा आम्ही निर्णय घेतला’.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :