सलमान खानच्या ‘बिग बाॅस’ची जादू आजही कायम!

spot_img

सोशल मिडियामुळे चित्रपट क्षेत्राला काहीशी घरघर लागली आहे. म्हणून चित्रपट कसाही तयार केला, किती खर्च केला, मल्टि स्टार कास्ट आणि कितीही ‘बिग’ बजेट चित्रपट असला तरी तो चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहायचा की नाही, हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या ‘मूड’वरच अवलंबून असतो. त्यामुळे सोशल मिडियाच्या प्रभावामुळे हल्ली एखादा चित्रपट हाऊसफुल्ल झाला किंवा पंधरा सोळा आठवडे चालला, अशा बातम्या ऐकायला येत नाहीत.

सोशल मिडियावर प्रत्येकजण ‘सेलिब्रिटी’ झालाय. मध्यंतरी ‘टिकटाॅक’वर अनेकांनी ‘सेलिब्रिटी’ व्हायची हौस भागवून घेतली. त्यामुळे बाॅलिवूडच्या नट नट्यांना तसं कुणी विचारीनासं झालं. टिकटाॅकवर केंद्र सरकारनं बंदी आणल्यानंतर लोकं फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर रिल Reel तयार करु लागलेत.

सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावामुळेच चित्रपट पाहण्यासाठी हल्ली गर्दी होताना दिसत नाही. त्यामुळे मोठमोठ्या अभिनेत्यांनी रियालिटी शोचा आधार घेतला. यातून मग चित्रपटाच्या जाहिराती, प्रायोजकत्व आदींच्या माध्यमातून मिळणार्‍या जाहिरातींमधून अभिनेते बक्कळ पैसा कमवू लागले आहेत.

बाॅलिवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतले ‘शहेनशहा’ आहेत. मात्र त्यांनीही छोट्या पडद्यावरच वेळ घालवणं पसंत केलंय. ‘कौन बनेगा करोडपती’ या शो नं तर त्यांना कोट्यवधींच्या कर्जातूनही मुक्त केलंय.

बाॅलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान यानंही मोजकेच नवे चित्रपट करारबध्द करत असताना रियालिटी शो चा रस्ता धरलाय. सलग 12 वर्षे तो ज्या रियालिटी शोचं सूत्रसंचालन करतो आहे, ब्रँड त्या बिग बाॅसची ब्रँड एंडोर्समेंट्स, प्रायोजकत्व, चित्रपटाची जाहिरात इतकंच नाही तर अनेक इतर गोष्टींद्वारे कमाई वाढते आहे.

गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीने 120 कोटींची कमाई केली होते. जाहिरातींतून बिग बॉस 16 रेव्हेन्यूने 150 कोटी कमावले. त्यातच शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या सीझनची कमाई जवळपास 180 ते 200 कोटींच्या आसपास सहज होइल असा अंदाज लावला जात आहे.

बिग बॉसच्या सीझन 16 मध्ये टीव्ही आणि ओटीटीवरील दर्शकांमध्ये 41% आणि 40% वाढ झाली आहे. बिग बॉस OTT प्लॅटफॉर्म Voot वर प्रसारित होतो. लोकांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे, याचा अंदाज लावण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. त्याच्या कमाईच्या या आकडेवारीवरून हे मात्र स्पष्ट होतं की, यंदाचा सिझनही त्याची जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :