सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का..! सविस्तर वाचा..

spot_img

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा विचार नाही ! वित्त राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची स्पष्टोक्ति !

देशाचे वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केलंय.

काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आपल्या पातळीवर नोटिफिकेशन जारी केलंय. अशा परिस्थितीत ‘एनपीएस’चे पैसे परत करण्याची कुठलीही तरतूद नाही. मात्र यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी घाेषणा केलीय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांत छत्तीसगड, झारखंड, राजस्थान व पंजाब सरकारने आपल्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली होती.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :