शेवगाव तालुक्यातल्या तळणी शिवारात असलेल्या एका जिनिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या, दोन मुलांचा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलीय. 

spot_img

शेवगाव तालुक्यातल्या तळणी शिवारात असलेल्या एका जिनिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या, दोन मुलांचा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलीय. 

तळणी शिवारातल्या एका जीनिंग मिल मध्ये काम करणाऱ्या कामगाराची मुलं तिथे उभ्या असलेल्या वाहनाखाली झोपले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. तो वाहन सुरु करुन निघाला असता गाडी खाली झोपलेले सुमारे चार व पाच वर्षाच्या, अशा दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जमाव संतप्त झाला असून, आम्हाला आमची मुले द्या, असे म्हणत जमावाने आक्रमक पवित्रा घेतला.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी व त्यांचे पथक तात्काळ दाखल झाले असून संतप्त जमावाची पोलिसांकडून समजूत काढली जाते आहे. घटनास्थळी जमावाने जाण्यास मज्जाव केल्याने, मुलांची नावे व निश्चित वय समजू शकले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार तर दोन्ही मुले मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :