शेवगावमध्ये दगडफेक करणारे बाहेर गावची मुलं ; नागरिक आणि पोलिसांचा संशय ! 

spot_img

शेवगावमध्ये दगडफेक करणारे बाहेर गावची मुलं ; नागरिक आणि पोलिसांचा संशय ! 

अहमदनगरच्या शेवगावमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर एक बाब समोर आली आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे दगड नेमके कोणी आणि कुठे आणून ठेवले होते, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. काही लोकांच्या माहितीनुसार अनेक बाहेरगावचे तरुण मुलं या दगडफेकीमध्ये सामील असल्याचा पोलीस आणि स्थानिक नागरिकांना संशय आहे.

काही तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात दगड आणि काठ्या घेऊन तरुण तोडफोड करताना दिसून आले. त्यामुळे ही दंगल पूर्वनियोजित होती का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण दगडफेकी साठी अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठमोठे दगड शहरामध्ये आले कुठून याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस याबाबत आता सखोल तपास करीत आहेत.

अहमदनगरमधील शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर रविवारी रात्री दगडफेक झाल्याची घटना घडली. काही तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात दगड आणि काठ्या घेऊन तरुण तोडफोड करताना दिसून आले. त्यामुळे ही दंगल पूर्वनियोजित होती का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण दगडफेकीसाठी अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठमोठे दगड शहरामध्ये आले कुठून याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस याबाबत आता सखोल तपास करीत आहेत.

अकोला या ठिकाणी ही हिंसा झाली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. त्यामुळे शहराच्या गल्लीबोळात दगड कुठून येतात की आणली जातात, याबाबत पोलीस तपास होणे गरजेचे आहे.

दरम्यान, अलीकडच्या काळात अहमदनगर शहरातही काही ठिकाणी दगडफेक झाली होती, त्या ठिकाणीही अचानकपणे मोठ-मोठे दगड फेकण्यात आले होते. त्यामुळे दगड नेमकं खोल जमा करतात किंवा जमा करायला लावते हेही तपासणी गरजेचे असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

तरुण संशयित आहेत, त्यांना कोंबिंग ऑपरेशन करून पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी 60 ते 70 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. तर या हिंसाचार प्रकरणी अडीचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :