शेतकर्‍यांसाठी ‘ही’ आहे आनंदाची बातमी!

spot_img

सप्टेंबर आणि आॅक्टोंबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या तसंच शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण १ हजार २८६ कोटी ७४ लाख ६६ हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. Crop Insurance

राज्यातल्या १० जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात ही आनंदाची बातमी असून १० जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे.

या १० जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झालं आहे Crop Insurance.

मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये वाटप सुरू झालं आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :