शेतकरी मित्रांनो ! ऐकलं का ? ‘या’ बाजारात कांद्याला मिळालाय विक्रमी भाव !

spot_img

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात असलेल्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या घोडेगाव उपबाजारात काल (दि. 19) 25 हजार 14 गोणी कांदा आवक झाली होती. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल ते 2 हजार 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे.

 

या लिलावात जवळपास दोनशे रुपयांची वाढ नमूद झाली आहे. कालच्या लिलावात लाल आणि उन्हाळी कांदा आवक झाली होती. यामध्ये लाल कांद्याला आठशे रुपये प्रति क्विंटल ते 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला.

 

यात गोल्टी कांदा ८०० ते १ हजार, गोल्टा १ हजार २०० ते १ हजार ५००, मुक्कल भारी १ हजार ६०० ते १ हजार ९००, मोठा कलर पत्तिवाला २ हजार १००, एक दोन लॉट २ हजार २०० ते २ हजार ६०० याप्रमाणे विक्री झाली आहे.

 

तसेच उन्हाळी कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल ते 2 हजार 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर नमूद झाला. यात एक दोन लॉट २४०० ते २७००, मोठा कलर पत्तीवाला २२५०, मुक्कल भारी ११०० ते १९००, गोल्टा ७०० ते १२००, गोल्टी ३०० ते ९००, जोड म्हणजे बेला कांदा ३०० ते ४००, हलका डॅमेज कांदा २०० ते ४०० याप्रमाणे कालच्या लिलावात सौदे झाले आहेत.

 

कांदा दरांत दोनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी कांदा दरात झालेली वाढ ही नगण्य असून यामध्ये अजून वाढ झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची आशा लागून राहिली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :