शेतकरी बांधवांनो ! कुसुम सोलर योजनेचा लाभ घेताय ना ? 20 जिल्ह्यांत सुरु आहे प्रक्रिया !
महाराष्ट्र राज्य सरकार, महावितरण, महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमानानं राज्यातल्या शेतकर्यांना पारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या माध्यमातून कुसुम सोलर योजना सुरु करण्यात आलीय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत अनेक शेतकर्यांनी घेतलाय.
राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी शेतकरी बांधवांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी बांधवांना दोन्ही अंगांनी फायदाच फायदा आहे. हल्ली महावितरण कंपनीच्या वीजेचं वेळापत्रक हे शेतकर्यांसाठी त्रासदायक आहे. त्यातही दिवसा वीज उपलब्ध असली तरी रोहित्रांवर फ्युज उडण्याचं प्रमाण खूप असतं.
अशा विचित्र आणि संकटमय परिस्थितीत सौर ऊर्जा हा पारंपरिक पर्याय खूप महत्वाचा आहे. यासाठी केंद्र सरकारनं कुसुम सोलर योजना खास शेतकर्यांसाठी सुरु केली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी झाल्यास महावितरण कंपनीचा वर्क लोड आपोआपच कमी होणार आहे.
या योजनेसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘केंद्र सरकारच्या कुसुम योजना अंतर्गत एक लाख मेडा तर्फे आणि महावितरणच्या माध्यमातून एक लाख सौर कृषी पंपांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
महावितरण महापारेषण महानिर्मिती, होल्डिंग कंपनी तसेच ऊर्जा विभागाने वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. Kusum Solar Pump Scheme 2023 त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेलच याशिवाय सबसिडीचा भारसुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल, त्यासाठी भाडे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
ज्यायोगे शेतकर्याला शाश्वत उत्पन्न देखील मिळू शकेल. विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसांत आठ तास सिंचन करता यावे, यासाठी महाराष्ट्राला 2 लाख कृषी पंप उद्दिष्ट केंद्र सरकारचे कुसुम योजना अंतर्गत देण्यात येत आहे. Kusum Solar Pump Scheme 2023 राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी सुरु झालीय.