शुंभागी पाटलांना आघाडी पाठिंबा जाहीर, तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काॅंग्रेसमधून निलंबित
नाशिक : आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा टप्पा अंतिम टप्प्यात आला आहे. यातच आता नाशिक येथील पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याची संपुर्ण माहिती दिली आहे. आज महाविकास आघाडीने पाच ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांकरीता आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
आज नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, आणि अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांमधील उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकांमधील सर्वोच चर्चेत असलेली नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार शुंभागा पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी लढत होणार असून भाजपने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाहीय.
यातच नागपुरमधूल सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुंभागी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहेत. या पाचही निवडणुका आम्ही जिंकू, त्याप्रकारचे वातावरण राज्यात आहे. जूनी पेन्शनचा हिशोब कुठेही चालू नाही. काॅंग्रेसच्या राज्यात जुनी पेन्शन लागू आहे. असंही नाना पटोले म्हणाले.