शिरगाव सरपंचाच्या खुनातील 4 संशयित ताब्यात

spot_img

शिरगाव सरपंचाच्या खुनातील 4 संशयित ताब्यात

 

तळेगाव दाभाडे दि.2 (प्रतिनिधी) शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंचाचा राजकीय व जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केला. ही घटना शनिवारी (दि.1) रात्री 9:30 च्या सुमारास साई बाबा मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर शिरगाव ता. मावळ हद्दीत घडली. शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन मध्ये रवींद्र साहेबराव गोपाळे यांनी फिर्याद दिली. मारेकरी अटक करा तरच मृतदेह ताब्यात घेणार, या मागणी साठी रविवारी पहाटे पासून पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आनंदोल केले, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत आठ दिवसात आरोपी अटक करण्याचे आश्वासन सहाय्यक पोलीस उपायुक्त पद्माकर घनवट यांनी दिले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण साहेबराव गोपाळे वय 47 खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

महेश भेगडे (रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ), अशोक लक्ष्मण कांबळे (रा. कांब्रे ना मा ता. मावळ), मनेश ओव्हाळ (रा. जांभूळ ता. मावळ) व अमोल आप्पासाहेब गोपाळे (रा.शिरगाव ता. मावळ) ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

शिरगाव-परंदवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

फिर्यादी यांचे भाऊ प्रवीण साहेबराव गोपाळे हे डिसेंबर 2022 पासुन शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर बिनविरोध निवड झाली तेव्हापासून सरपंच म्हणून कार्यक्षम पणे काम करत होते, गावातील लोकांच्या अडचणी ते सोडवण्याचे काम करत होते. त्याबाबत त्यांचे जनमत चांगले होते. शिरगाव येथील साई मंदीरा मागील गट क्रमांक 166 मधील 6 एकर जागा मुळ मालक मयत पन्नालाल शहा रा. तळेगाव दाभाडे यांचेकडुन सन 2013-2014 मध्ये संतोष प्रभाकर तरस व इरन्ना कृष्णाप्पा रायचुरकर (दोघे रा. डॅफोडील सोसायटी सोमाटणे फाटा) यांनी सदरची जमीन विकत घेवुन शेती झोन फार्म हाऊस प्लॅट अद्याप पर्यंत 50-60 विकलेले आहेत. व सध्या त्याठिकाणी अंदाजे 100 लोक बंगले बाघुन राहतात.

सन 2018 पासुन शिरगाव येथील जमीनीचा भाव वाढल्याने गट क्रमांक 166 मध्ये राहणाऱ्या लोकांना महेश भेगडे, अशोक लक्ष्मण कांबळे, मनेश ओव्हाळ हे त्रास देत होते. त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या घराच्या दरवाज्यावर सदर जागा खाली करा जागेच लीटीकेशन आहे. बांधकाम करू नये अशा आशयाचे त्यांनी स्वता:छापलेल्या नोटीसा चीकटवुन लोकांना धमकावत होते. ते सर्व लोक सरपंच प्रविण गोपाळे यांच्याकडे मदतसाठी आले. त्या जागेवरून त्यांच्या तक्रारी झाल्या.

 

डिसेंबर 2022 मध्ये शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्या नंतर आठ ते दहा दिवसानंतर प्रवीण गोपाळे यांचा प्रतिस्पर्धी अमोल आप्पासाहेब गोपाळे रा. डॅफोडील सोसायटी सोमाटणे फाटा) त्यांच्या मोबाईल वरून फिर्यादीला फोन करून” माझ्या विरोधात जर तुझ्या भावाने काम केले तर मी त्याला खुर्चीवर बसु देणार नाही त्याला समुजन सांग अशी धमकी दिली होती” दोन दिवसा पुर्वी प्रविण गोपाळे यास गट क्रमांक 166 मधील जमीनीत लक्ष घालु नको व तिथे राहणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करू नको नाहीतर तुझ्याकडे बघुन घेईल म्हणुन फोनवर महेश भेगडे याने धमकी दिली.

असलेबाबत प्रविण ने मला सांगितले होते. याशिवाय मी व अॅड. जगन्नाथ गोपाळे असे काल दि. 31/03/2023 रोजी संध्याकाळी 7/00 वा. चे सुमारास आमच्या गावचे माजी सरपंच उस्मान भाई शेख यांच्या घरी माझ्या कामा निमित्ताने गेले असता, मनिष ओव्हाळ व अशोक कांबळे त्याठिकाणी आले व मला म्हणाले की, तुझ्या भावाला समजुन सांग जमीन गट क्रमांक 166 मध्ये लक्ष घालु नको त्याचेकडे बघुन घेईल हे दोघे हे महेश भेगडे यांच्या सांगण्यावरून काम करतात असे माझा भाऊ प्रविण मला नेहमी सांगत होता. असे फिर्यादीत म्हणाले आहे. या खुनाचा तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :