शिंदे – भाजप सरकारचं नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन ! आज सायंकाळी होणार चहापानाचा कार्यक्रम ; विरोधकांना देण्यात आलंय निमंत्रण !

spot_img

शिंदे – भाजप सरकारचं नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन ! आज सायंकाळी होणार चहापानाचा कार्यक्रम ; विरोधकांना देण्यात आलंय निमंत्रण !

शिंदे – भाजप सरकारचं उद्यापासून (दि. 19) राज्याची उयराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम होणार आहे. या अधिवेशनाचं शिंदे – भाजप सरकारकडून महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विरोधी पक्षातल्या आमदारांना आमंत्रण देण्यात आलंय.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतून नागपूरकडे रवाना झाले आहेत. या हिवाळी अधिवेशनात विरोधक राज्य सरकारला अनेक मुद्द्यांवर धारेवर धरणार आहेत. यामध्ये राज्यपालांच्या वक्तव्यांचा मुद्दा ऐरणीवर येणार असून अनेक मुद्दे या अधिवेशनात चर्चिले जाणार आहेत.

दरम्यान, सरकारकडून सायंकाळी होणार्‍या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षाने नेते आणि आमदार हजर राहणार की नेहमीप्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार, हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र दुपारनंतर याविषयी माहिती मिळेल.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांना अनुसरुन विरोधी पक्ष सत्ताधारी सरकारला सळो की पळो करुन सोडणार आहे. राज्यातल्या शेतकर्‍यांना अवकाळीची न मिळालेली नुकसान भरपाई, शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी, सोयाबीन, कपाशीचं न मिळालेलं अनुदान या आणि अशा अनेक समस्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या एका प्रवक्त्यानं महापुरुषांबद्दल केलेली अवमानकारक वक्तव्ये यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

राज्याचा घसरलेला विकासदर, राज्यातले अनेक प्रकल्पांचं गुजरातला स्थलांतर, राज्यात होणारी आर्थिक गुंतवणूक या आणि इतर अनेक मुद्यांवर विरोधक शिंदे – भाजप सरकारच्या कारभाराचे कशापध्दतीनं वाभाडे काढताहेत, याकडे राज्यातल्या संपूर्ण जनतेचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :