शहरातील किरकोळ वादाच्या अनुषंगाने परिस्थिती सामान्य असून कोणीही अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल- SP राकेशकुमार ओला

spot_img

शहरातील किरकोळ वादाच्या अनुषंगाने परिस्थिती सामान्य असून कोणीही अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल- SP राकेशकुमार ओला

नगर – अहमदनगर सायबर पोलीस हे अश्या प्रकारच्या अक्षेपाहार्य संदेश पसरविणाऱ्या सर्व प्रकारच्या सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे. तरी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अश्या प्रकारचे संदेश कोणीही सोशल मिडीयावर प्रसारित करू नये अन्यथा सदर इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. असा इशारा अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांनी दिला आहे.

या बाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, दिनांक ०४/०४/२०२३ रोजी गजराज नगर येथे घडलेल्या किरकोळ वादाच्या अनुषंगाने परिस्थिती सामान्य असून सदर ठिकाणी तसेच मुकुंदनगर परिसरात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून कोणत्याही धार्मिक स्थळांवर दगडफेक झालेली नाही. सदर बाबत कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तरी कोणत्याही प्रकारच्या सोशल मिडिया वरून जसे कि WhatsApp, Facebook, Twitter ई. वरून अक्षेपाहार्य मजकूर प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

तरी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अश्या प्रकारचे संदेश कोणीही सोशल मिडीयावर प्रसारित करू नये अन्यथा सदर इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. असा इशारा अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :