व्वा रे पठ्ठ्या ! चक्क लाकडापासून बुलेट तयार केली ! पेट्रोलच्या टाकीत बसवली म्युझिक सिस्टीम !

spot_img

व्वा रे पठ्ठ्या ! चक्क लाकडापासून बुलेट तयार केली ! पेट्रोलच्या टाकीत बसवली म्युझिक सिस्टीम !

 

देशी जुगाड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सामान्य भारतीयांनी बनवलेल्या अनेक गोष्टी उभ्या राहतात. सध्या सोशल मीडियाच्या युगात या प्रकारचं कौशल्य सर्वांसमोर येतं, ज्यास आपण देशी जुगाड म्हणतो.

 

इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ४० लाखांपेक्षा अधिक व्यूज मिळाले असून हा व्हिडिओ प्रचंड गाजत आहे. या व्हिडिओतील एका तरुणाने लाकडापासून बुलेट बनवली आहे. विशेष म्हणजे ही बुलेट अगदी खर्‍या बुलेटसारखी दिसते आणि चालवतानाही तसाच भास होतो. इतकंच काय तर फ्यूल टॅंक आणि सायलेन्सर देखील लाकडाचा आहे. हे अद्भूत कौशल्य पाहून सोशल मीडियावर या तरुणावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

हा व्हिडिओत एक तरुण बुलेटवर बसला आहे आणि पाहून आपल्याला शंका सुद्धा येत नाही की ज्या बुलेटवर तो बसला आहे, ती बुलेट लाकडाची असेल. बुलेट सुरु केल्यावर तंतोतंत खर्‍या बुलेटसारखाच आवाज येतो. विशेष म्हणजे ही बुलेट इंधनाशिवाय चालते, त्यामुळे खिशाला परवडणारी आहे.

चार्जेबल बॅटरीद्वारे ही बुलेट सहज धावते. गंमत म्हणजे फ्यूल टॅंकमध्ये म्युझिक सिस्टिम लावण्यात आली आहे. व्हिडिओ बनवणार्‍याने ही सर्व माहिती दिली आहे. आता ह अव्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की कदाचित कुणीतरी या तरुणाला असीच बुलेट बनवण्याची ऑर्डर देऊ शकतो.

खाली दिलेली लिंक ओपन करा आणि इंस्टाग्राम ॲपवर बुलेट ‘याचि देही याचि डोळा’ पहा…!

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :