विश्रांतवाडी : जास्तीचे पैसे दिल्यानंतरही मारण्याची धमकी देणार्या सावकाराला अटक
पुणे : – ७५ हजार रुपयांच्या कर्जावर १ लाख ८६ हजार रुपये परत केले असतानाही अजून ७५ हजार रुपयांची मागणी करुन मारण्यासाठी घरी माणसे पाठविणार्या सावकाराला (Money Lender) पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे.
विशाल किसन धोत्रे Vishal Kisan Dhotre (वय ४१, रा. प्रतिकनगर, मोहनवाडी, येरवडा) असे या बेकायदेशीर सावकारी करणार्याचे नाव आहे.
याबाबत धानोरी येथील एका ४१ वर्षाच्या नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१/२३) दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विशाल धोत्रे याच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने ७५ हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी धोत्रे याला १ लाख ८६ हजार रुपये परत केले होते. असे असतानाही अजून मुद्दल फिटले नसल्याचे सांगून ७५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फिर्यादीच्या घरी माणसे पाठविले. फिर्यादीस शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या सावकाराला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.