विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारच्या तेजीत महत्वपूर्ण भूमिका !

spot_img

विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारच्या तेजीत महत्वपूर्ण भूमिका !

गेल्या आठ दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला. त्यापूर्वी सेन्सेक्सनं 63 हजारांचा टप्पा ओलांडला. तरीही भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर आहे.

भारतीय शेअर बाजाराला उच्चाकी पातळीवर नेण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांची मोठी आणि महत्वाची भूमिका आहे. दोन महिने सातत्यानं शेअर बाजारातून माघार घेतल्यानंतर विदेशी गुंतवणुकीदारांनी मागच्या महिन्यात पुन्हा एकदा जोरदार खरेदी केली.

अमेरिकन डॉलर इंडेक्समधील कमजोरी आणि भारतासाठी सकारात्मक एकूण आर्थिक दृष्टीकोन यामुळे नोव्हेंबरमध्ये FPIs ने भारतीय इक्विटी मार्केटमध्ये 36 हजार 329 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे बाजाराने नवा विक्रमी उच्चांक निर्माण केला आहे.

2022 चा हा तिसरा महिना आहे. या तिसर्‍या महिन्यातही गुंतवणुकीचा प्रवाह सकारात्मक आहे. डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यातही हा फ्लो सकारात्मक राहिला आहे. अरिहंत कॅपिटलचे पूर्णवेळ संचालक आणि संस्थात्मक व्यवसाय प्रमुख अनिता गांधी म्हणाल्या, ‘डिसेंबरमध्ये एफपीआयचा प्रवाह सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे’.

FPIs महाग समभागांकडून मूल्याभिमुख समभागांकडे वळू शकतात. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले, की भारताला एफपीआय गुंतवणुकीचा वाटा मिळेल. तथापि, उच्च मूल्यांकनामुळे यावर परिणाम होऊ शकतो.

नोव्हेंबरमध्ये FPIs ने स्टॉकमध्ये 36 हजार 329 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारच्या या सकारात्मकतेचा प्रभाव आणखी किती आठवडे राहतो, हे सांगणं सध्या तरी अशक्य आहे. मात्र विदेशी गुंतवणूकदारांसह भारतीय गुंतवणूकदारांचा यामध्ये सहभाग वाढला तर शेअर बाजाराला ‘अच्छे दिन’ आल्याशिवाय राहणार नाहीत, हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :