वाशिममध्ये लग्नाच्या पहिल्याचं रात्री नवरीला लागली तहान, पाणी घेऊन आल्यावर नवरदेवला घामचं फुटला

spot_img

वाशिममध्ये लग्नाच्या पहिल्याचं रात्री नवरीला लागली तहान, पाणी घेऊन आल्यावर नवरदेवला घामचं फुटला

 

वाशिम: वधुने फसवणुक केलेल्या संबंधित एक प्रकरण वाशिममधुन समोर आले आहे,जे ऐकुन प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे.वधु लग्नानंतर लगेचच वराचे आणि सासरचे सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळुन गेली होती.

 

असे म्हटले जाते की,सासरच्या घरी परतत असताना त्याने अत्यंत चतुराईने ही फसवणुक केली.बॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूर अभिनीत ‘डॉली की डोली’ च्या षड्यंत्राशी जुळणारी ही घटना वाशिम जिल्ह्यातुन समोर आली आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार,अमित सुनिल पिंगळे नावाच्या व्यक्तीचे लग्न २ दिवसापुर्वी एका मध्यस्थीद्वारे निश्चित झाले होते.ज्याने मुलाच्या वडिलांसमोर अशी अट ठेवली की त्याला मुलीला ८० हजार रुपये द्यावे लागतील.अमितचे वडील सहमत झाले कारण त्यांचा मुलाचं लग्न होतं नव्हतं.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,निश्चित रक्कम भरल्यानंतर अमितने २१ डिसेंबर रोजी त्या काजलशी लग्न केले होते.लग्नाच्या वेळी,वराच्या बाजुने वधूच्या बाजुने कपडे-दागिने, पैसे आणि इतर भेटवस्तु देखील दिल्या गेल्या.

 

लग्न आटोपल्यानंतर वधु आणि वर घरी जाण्यासाठी घराकडे निघाले.घरी पोहचल्यावर सगळे कार्यक्रम आटोपल्यानंतर वधु-वरं खोलीत गेले.अमित तोंड धुवुन फ्रेश होऊन आल्यावर वधुला तहान लागल्याने अमित पाणी आणायला गेला.पाणी घेऊन आल्यावर तो हादरलाचं.ना तिथे नवरी होती ना दागिने.सगळे दाग-दागिने आणि पैसे घेउन नवरी फरार झाली होती.

 

अमितने आरडा-ओरड करत घरच्यांना बोलावलं अन् सगळ्याचं डोक चक्रावलं.आपली फसवणुक झाल्याचं कळताचं सगळ्यांनी पोलिस स्टेशन गाठलं.अखेर वराच्या बाजुने वधूच्या विरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.त्यानंतर तात्काळ पोलिसांनी मध्यस्तीसह तरुणी आणि तिच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :