वडगाव पान ता. संगमनेर येथील वेश्या व्यवसायावर छापा*एक परप्रांतीय पीडित मुलींची सुटका व एक आरोपी ताब्यात
नगर विशेष प्रतिनिधी:- दि.16/01/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना वडगाव पान ता. संगमनेर येथे सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन एक परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.आरोपी नामे प्रतिक उत्तर आणि एक महिला आरोपी अशा दोघां विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गु. र.नं.23/2023, महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर Dysp संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली PI राजेंद्र भोसले, 𝙰𝚙𝚒 ठाकरे, पो.हे .का.सुरेश औटी पो.ना.निलेश मेटकर,पो.ना.दिपक रोकडे,पो.कॉ लगड,पो.कॉ नितीन शिरसाठ, म.पो.कॉ वाकचौरे यांनी केली.