लोकनाट्य तमाशा बंद पाडण्याची या तरुणांनी दाखवली मर्दुमकी ; पोलिसांनी केला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

spot_img

लोकनाट्य तमाशा बंद पाडण्याची या तरुणांनी दाखवली मर्दुमकी ; पोलिसांनी केला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

महाराष्ट्राची जीवंत कला असलेला लोकनाट्य तमाशा हा ग्रामीण भागातल्या जनतेच्या मनोरंजनाचं हक्काचं साधन. बतावणी, रंगबाजी, गण गवळण आणि वगनाट्य अशा विविध भागांत सादर होणारा लोकनाट्य तमाशा हा खरं तर समाज प्रबोधनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

मनोरंजनासह समाज प्रबोधन हे या लोकनाट्य तमाशाचे वैशिष्ट्य राहिले आहे. मात्र महाराष्ट्राची ही जीवंत कला असलेला लोकनाट्य तमाशा बंद पाडण्याची मर्दुमकी काही तरुणांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात हा घाणेरडा प्रकार घडला. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

अकोले तालुक्यातल्या तांभोळ येथे तुळजाभवानी यात्रेनिमित्त आयोजित लोकनाट्य तमाशात तरुणांनी हुल्लडबाजी करुन तमाशा बंद पाडला. याप्रकरणी आठ तरुणांसह अज्ञात पंधरा अशा एकूण पंचवीस जणांवर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात्रेनिमित्त सुरू असलेल्या तमाशात आरडओरड व गोंधळ करुन तरुणांनी तमाशा बंद पाडला. यात्रा समितीचे अध्यक्ष व सदस्यांना धक्काबुक्की शिवीगाळ केली. तसेच तमाशाच्या रंगमंचावर जाऊन कॅमेरा, वाद्य व इतर साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले.

याबाबत सरपंच जयश्री माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी गावातील सुनील भाऊ पवार, विलास अर्जुन मोहिते, राहुल संजय चव्हाण, रोहिदास बाळासाहेब जाधव, जनार्दन ज्ञानेश्वर साळुंखे, अनिल शंकर साळुंखे, तुषार निवृत्ती चव्हाण, सूरज अर्जुन पवार व इतर अनोळखी पंधरा इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील सरपंच पदाच्या निवडीवेळी असाच गोंधळ झाला होता. त्यावेळीही पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगविला होता. वास्तविक पाहता सार्वजनिक कार्यक्रमात धुडगूस घालणाऱ्या असल्या टुकार तरुणांना यात्रेदरम्यान गावातून दुसऱ्या जिल्ह्यात हद्दपार करण्याची आवश्यकता आहे.

काही उल्लड आणि टार्गेट तरुणांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येत असून यामुळे कायदा सुव्यवस्थेला देखील गालबोट लागत आहे त्यामुळे अशा तरुणांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची अपेक्षा ग्रामीण भागातल्या जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :