लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांचा सौम्य लाठी मार !

spot_img

लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांचा सौम्य लाठी मार !

बीड जिल्ह्यातल्या एका बियर बार आणि हाॅटेलच्या उद्घाटनानिमित्त लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमात तरुणाईचा इतका अतिउत्साह होता, की पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

गौतमी पाटील लावण्या सादर करण्याची अदाकार दिवसेंदिवस काहीशी वादग्रस्त होत असल्याचा आरोप केला जातो आहे. हा कार्यक्रम काहीसा अश्लिलतेकडे झुकला जाऊ लागल्यानं या कार्यक्रमावर बंदी आणावी, अशी मागणी काही संघटनांनी केलीय.

‘रातीला अर्ध्या रातीला असं जायाचं नाय’ या लावणीवर गौतमी पाटीलनं केलेल्या अश्लिल अदाकारीचा व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाला आणि गौतमी पाटीलची प्रचंड क्रेझ झाली.

यामुळे गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला तरुणाईची गर्दी होत आहे. बीडमध्येही अशीच गर्दी झाली. हा कार्यक्रम दिसत नाही काही तरुण थेट झाडावर चढले. तर काही तरुणांनी कार्यक्रमादरम्यान प्रचंड हुल्लडबाजी केली.

विशेष म्हणजे या कार्यक्रमामुळे बीड – परळी महामार्गावरची वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. कार्यक्रमाचे आयोजक आणि पोलिसांच्या चुकीच्या नियोजनामुळे गोंधळ उडाला. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठी मार केला.

महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांबद्दल नेहमी बोललं जातं, की ‘किर्तनानं समाज सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही’. कीर्तन आणि नृत्य या एकाच नाण्याच्या दोन बाजूच्या सांगितल्या जातात. कारण कीर्तन हा शब्द उलटा वाचला की त्यातून ‘नर्तकी’ हा शब्द तयार होतो.

किर्तनात टाळ वाजतात तर नृत्यामध्ये नृत्यांगणांच्या पायातले चाळ वाजतात. असं असली तरी लावणी कलाकार गौतमी पाटीलची लावणी सादरीकरणाची कला वादग्रस्त होत आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

वास्तविक पाहता गौतमी पाटीलने मध्यंतरी याबद्दल रसिक प्रेक्षकांची जाहीर माफीदेखील मागितली. मात्र गौतमी पाटीलच्या सादरीकरणाचा बाज काही बदलेला नाही. या कार्यक्रमात पोलीस यंत्रणा यापुढे नक्की काय अंमलबजावणी करणार, हा मोठा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :