रेल्वेच्या टीसीनं तिकीट मागितलं आणि ‘त्या’ माथेफिरुनं टीसीवरच केला प्राणघातक हल्ला !

spot_img

रेल्वेच्या टीसीनं तिकीट मागितलं आणि ‘त्या’ माथेफिरुनं टीसीवरच केला प्राणघातक हल्ला !

ठाणे जिल्ह्यातल्या आंबिवली रेल्वेस्थानकावर आज (दि. 19) अर्ध्या तासापूर्वी एक भयानक आणि खळबळजनक घटना घडलीय. या रेल्वेस्थानकातल्या तिकीट चेकरनं टीसी TC एका प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली. मात्र या प्रवाशानं तिकीट न दाखवता त्या टीसीवरच प्राणघातक हल्ला केला.

हा अज्ञात प्रवाशी नशेत होता. त्याच्याकडे एक ब्लेड होतं. टीसीनं तिकिटाबद्दल विचारणा करताच त्या प्रवाशानं टीसीच्या मानेवर ब्लेडनं वार केले. टीसीच्या मानेतून भळभळ रक्त यायला लागलं. हे ध्यानात आल्यानं रेल्वे कर्मचार्‍यांनी त्या टीसीला उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात नेलं.

दरम्यान, हा प्रकार सुरु असताना एकच गोंधळ उडाला आणि या गोंधळात तो हल्लेखोर प्रवाशी पसार झाला. ठाणे जिल्ह्यातल्या आंबिवली रेल्वेस्थानकावर गेल्या अनेक दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे इथले अधिकारी काय करताहेत, हा खरा प्रश्नच आहे.

या रेल्वेस्थानक परिसरात असे अनेक गर्दुल्ले प्रवाशी भटकत असतात. त्यामुळे महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबना आणि गैरसोय होते. अशा प्रवाशांपासून महिला प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. या घटनेतून सदर रेल्वेस्थानकावर नियुक्तीला असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

ठाणे जिल्ह्यातल्या आंबिवली रेल्वेस्थानकासह राज्यातल्या अनेक रेल्वेस्थानक परिसरात बाहेरगावी जाण्यासाठी येणार्‍या प्रवाशांच्या जिविताचा प्रश्न या घटनेच्या अनुषंगानं ऐरणीवर आला आहे. राज्यातल्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा कशी रामभरोसे आहे, हेदेखील या घटनेमुळे अधोरेखित झालं आहे.

अशा घटनांवरुन रेल्वेस्थानक परिसरातले प्रवाशी आणि टीसी हे नक्कीच सुरक्षित नाहीत, ही बाब प्रकर्षानं समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या आंबिवली रेल्वेस्थानक परिसरात टीसीवर हल्ला करणार्‍या या अज्ञान प्रवाशाला पोलिसांनी अटक केली का, त्यानं असे हल्ले इतरांवर केले आहेत का, या आणि अन्य बाबींचा अद्याप उलगडा झालेला नाही.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :