राज्यातल्या दंगलींचा मास्टरमाईंड माजी मुख्यमंत्री ; आमदार राणे यांचा खळबळजनक दावा !

spot_img

राज्यातल्या दंगलींचा मास्टरमाईंड माजी मुख्यमंत्री ; आमदार राणे यांचा खळबळजनक दावा !

रामनवमी आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या दंगलींचा मास्टरमाईड मुंबईतल्या कलानगर भागातला असून तो या राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे, असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

या संदर्भात आमदार राणे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राणे म्हणाले, की ‘काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातल्या दंगलीचा मास्टरमाईंड शोधण्याचं आवाहन केलं आहे.

अजित पवार यांना मी सांगू शकतो की राज्यातल्या दंगलीचा मास्टरमाईक माजी मुख्यमंत्री असून शरद पवार यांच्या सिल्वर बंगल्यावर तो नुकताच येऊन गेला तो कलानगर परिसरात राहत आहे मुख्यमंत्री बनण्याची हाऊस त्यांची अजूनही गेलेली नाही त्यामुळे या दंगलीमध्ये त्यांचा हात आहे’.

आमदार राणे यांनी केलेला आरोप नेमका कशाच्या आधारावर आहे. त्यांनी या दंगलीमागच्या मास्टरमाईंडसाठी त्यांचे नाव घेतलं, त्यासाठी त्यांच्याकडे कुठले पुरावे आहेत? असतील तर ते पुरावे आमदार राणे हे राज्याच्या गृहमंत्र्यांना सादर करतील का, केवळ सवंग लोकप्रियतासाठीच हे असले आरोप करण्यात येत आहेत का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :