केंद्र सरकारनं धूर मुक्त आणि राॅकेलमुक्त देश करायचं धोरण अवलंबविल्यापासून सर्वसामान्यांचा स्वयंपाक हा गॅसवर आला. परिणामी घरगुती गॅसच्या किंमतींकडे सर्वांचं विशेषत: गृहिणींचं खास लक्ष असतं. या पार्श्वभूमीवर घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती काहीशा कमी झाल्या आहेत. या बातमीतून तुम्हाला हे समजून येईल, की कुठल्या शहरात गॅस सिलेंडर्सच्या दरांची काय परिस्थिती आहे?
एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये सातत्यानं बदल होत असतो. मात्र यावेळी केंद्र सरकारनं गृहिणींना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. एलपीजी घरगुती गॅसच्या सिलेंडर्सच्या किंमती 115 रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर्सच्या किंमती 275 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत.
यापुढे देशाची राजधानी असलेल्या नवीदिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1859 . 5 ऐवजी 1 हजार 744 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1995 . 50 ऐवजी 1846 रुपयांना मिळणार आहे.
मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर्सचे दर 1844 ऐवजी 1696 असे राहणार आहेत. चेन्नईत एलपीजीचे गॅस सिलेंडर 2009 . 50 ऐवजी 1893 रुपयांना मिळणार आहे.
एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये सलग सातव्या महिन्यांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी भारत गॅसची नगर जिल्ह्यात चांगल्यापैकी पकड होती. गॅस संपल्यानंतर ग्राहकांना भारत गॅसच्या बुकींग आणि गोडावूनवर भल्या पहाटे लांबच लांब रांगा लावाव्या लागायच्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते चित्र पूर्णत: बदलून टाकलं.
गेल्या वीस वर्षांपूर्वी गॅस सिलेंडर्स विक्रीमध्ये प्रचंड काळा बाजार व्हायचा. एक एका व्यक्तीकडे वीस वीस घरगुती गॅस सिलेंडर्सची कार्ड्स असायची. यातून अनेकांनी चांगला पैसा कमावला. मात्र जेव्हापासून घरगुती गॅसची आॅनलाईन नोंदणी सुरु झाली, तेव्हापासून गॅस सिलेंडर्स विक्रीतला काळ्याबाजाराला झटका बसला.
दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमती आणखी कमी व्हाव्यात, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. गॅसवरचं जो टॅक्स आहे, तो कमी करुन गॅस सिलेंडर्सचे भाव कमी करता येणं राज्य सरकारला शक्य आहे. हा बदल करावा, अशी मागणीही यानिमित्तानं होत आहे.