राजीनामा नाट्यातून शरद पवारांनी काय मिळवलं ; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून वाचा !

spot_img

देशाचे माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जर का द्यायचाच होता तर त्यांच्या पक्षाचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी त्यांनी खासगीत चर्चा केली असती मात्र कार्यक्रमात त्यांनी राजीनामाचे नाट्य करणे हा एक ठरवून केलेला कार्यक्रम आहे असं म्हणण्याला भरपूर वाव आहे.

शरद पवारांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत कधीही भावनिक राजकारण केलं नाही मात्र यावेळी त्यांनी राजीनामानाने केलं त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची त्यांना कल्पना असणारच होती त्यामुळेच पक्षाचे सर्व पदाधिकारी जेष्ठ कनिष्ठ नेते आणि कार्यकर्ते एकत्रित उपस्थित असताना त्याने राजीनामांना त्याचे हे त्या उपसलं.

पवारांनी आजपर्यंत बिनकामाचं काहीही केलेलं नाही. विशेष म्हणजे पवार हे जे करायचे ते सांगत नाही जे सांगतात ते करत नाही हा त्यांच्याबद्दलचा आज वरचा इतिहास आहे. मात्र त्यांच्या या राजीनामा नाट्यामुळे संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशांत याविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाल्या अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आता शरद पवार यांनी या राजीनामा नाट्यातून काय मिळवलं हे या लेखात आपण आज अभ्यासणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठून त्याचा ठाकरे गट होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठीच राजीनामा नाट्य होतं, अशी उघड चर्चा आता ऐकायला मिळत आहे. अजित पवार कधीही पक्ष सोडून जाऊ शकतात अजित पवार यांच्याबरोबर अनेक जण बंडखोरी करू शकतात अशा वावड्या यापूर्वी कधी उठल्या नव्हत्या पण तशी शक्यता नाकारता येत नव्हती.

दरम्यान, अजित पवार काही सहकारी आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या यामध्ये अजित पवार एकटे नव्हते तर त्यांच्याबरोबर अनेक आमदार होते आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा एक गट भाजपबरोबर जाण्यास अनुकूल होता. हा गट शरद पवार निर्माण करत होता, हे आता उघड झालं आहे.

शरद पवारांनी या राजीनामानाठ्यातून त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केडर आणि असंख्य कार्यकर्ते असल्याचे दाखवून दिलं. राजीनामाची गोष्ट करण्यासाठी पवारांनी जी जागा निवडली ही जागा आणि कार्यकर्ते या दोन्ही गोष्टी पवारांच्या फायद्यासाठी अनुकूल आहेत, हे सिद्ध करण्यासाठी हीच वेळ योग्य होती, असे यामुळे सिद्ध झालं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांना पवारांच्या या राजीनामे नाट्याचा अंदाज बिलकुल नव्हता.

पवारांच्या या राजीनामा नाट्यवेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला निवृत्त होण्याचा हा निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला दरम्यान अशा अडचणीच्या वेळी इच्छा असो किंवा नसो पण बहुतेक नेत्यांना कार्यकर्त्यांच्या सुरक्षा मिळवावा लागला आता या नेत्यांची शरद पवारांवर काम करण्याची जबाबदारी पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे.

पवारांच्या या राजीनामा नाट्यामुळे भविष्यात कुठलाही नेता पवारांच्या विरोधात भविष्यात बंड करण्यास धजावणार नाही. वास्तविक पाहता शरद पवार हे अत्यंत मुत्सद्दी नेते आहेत. आतापर्यंत पवारांनी पक्षात स्वतःपेक्षा इतरांना काडीचंही महत्व दिलं नाही. एकंदरीत, या राजीनामा नाट्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हेच सर्वेसर्वा आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :