राजपत्रित अधिकारी तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी !

spot_img

टीम । महासत्ता भारत
Team । Mahasatta Bharat

राजपत्रित अधिकारी Gzeted Officer आयएस तुकाराम मुंढे IAS Tukaram mundhe यांच्या बदलीच्या विरोधात पुण्यातल्या टिळक चौकात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलीय. मुंढे यांची बदली रद्द झाली पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेसकडून सह्यांची मोहिम राबवण्यात येत आहे.

‘मुंढे साहेब, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा प्रकारचे फलक लावून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आएएस मुंढे यांच्या कार्यपध्दतीचं समर्थन केलंय. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढेंकडे आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना रात्री-बेरात्री भेटी देण्याचे आदेश काढले.

रुग्णांना २४ तास वैद्यकीय सेवा मिळून त्यांची प्रकृती सुधारावी, असा मुंढे यांचा या आदेशांमागे हेतू होता. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले होते.

यामध्ये आरोग्य खात्यातील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवळी सूचना देण्यात आल्या होत्या. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात तुकाराम मुंढे हे आरोग्य आयुक्तपदी रुजू झाले होते. मात्र अवघ्या ५९ दिवसांत त्यांची २९ नोव्हेंबरला बदली करण्यात आली. मुंढे यांच्याकडे कोणत्याही खात्याचा पदभार अद्याप देण्यात आलेला नाही.

दरम्यान, १६ वर्षांच्या सेवेमध्ये तुकाराम मुंढे यांची १५ पेक्षा अधिक वेळा बदली झाली आहे. यावरून तुकाराम मुंढे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. त्यातच पुण्यात युवक काँग्रेसच्यावतीने तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :