‘या’ साधूला पाहून अमिताभ बच्चन झाले थक्क ; म्हणाले, ‘भारत तर अविष्काराची जननी’ !

spot_img

‘या’ साधूला पाहून अमिताभ बच्चन झाले थक्क ; म्हणाले, ‘भारत तर अविष्काराची जननी’ !

गेल्या अनेक वर्षांपासून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी आपल्याला भुरळ घातली आहे. 40 वर्षांहून अधिक काळ सिनेविश्वात राहून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अनेकदा व्हि-लॉग्सच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ते सतत क्रियाशील राहतात.

सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्याची दखल चक्क बिग बी यांनी घेतली आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध साधू आपल्या डोक्यावर एका प्लेटच्या साह्याने चेहऱ्यासमोर पंखा आणि मागे सौर पॅनेलसह हेल्मेट घालून फिरतो आहे. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी या व्यक्तीने तयार केलेला हा देशी जुगाड पाहून अमिताभ बच्चनदेखील या व्यक्तीचे कौतूक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

आज म्हणजे 3 एप्रिलला बिग बींनी एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘भारत अविष्काराची जननी! भारत माता की जय’.

भर उन्हात थंड हवा मिळविण्यासाठी या अवलियाने हा देशी जुगाड केला आहे. डोक्यावर सोलर पॅनल आणि पंखा लावून या वृद्ध साधूने सोलर फॅन तयार केला आहे, जो तो स्वत:सोबत घेऊन फिरतो आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील लखीमपुर जिल्ह्यातला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :