‘या’ महिला आएएस अधिकार्‍याची एका महिन्यात तिसर्‍यांदा बदली !

spot_img

‘या’ महिला आएएस अधिकार्‍याची एका महिन्यात तिसर्‍यांदा बदली !

 

तुकाराम मुंढे यांचं रेकाॅर्ड ब्रेक केल्याची होतेय चर्चा !

 

सरकारी नोकरी म्हटलं, की बदलीची प्रक्रिया ओघानं आलीच. या बदलीसाठी खास करून ओळखलं जातं ते म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात त्यांची बदली हा चर्चेचा विषय राहिला आहे. आत्तापर्यत 16 वर्षात 20 वेळा बदल्या झालेले एकमेव अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

 

 

दरम्यान, राज्याच्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने आज सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात राजेश पाटील सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून तर भाग्यश्री बानायत यांना नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आले आहे. आजच्या या बदलीतून नाशिक महापालिकेत स्वच्छ, कार्यक्षम अधिकारी लाभले आहेत.

 

आयएएस अधिकारी असलेल्या बानायत यांची सरकारने महिनाभरात तिसऱ्यांदा बदली केली आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंडे यांचा रेकॉर्ड मोडला आहे. भाग्यश्री बनायत यांची महिनाभरातच तिसऱ्यांदा बदली झाली आहे. त्यामुळे त्याच्या नावावर कमी काळात जास्त बदल्या असा रेकॉर्ड बनला आहे.

 

आयएएस बानायत गेल्या महिन्यात साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून बदली केली होती.

 

आठवडाभरातच त्यांची नाशिक विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा महिन्याच्या आतच त्यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

 

या अशा कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची सातत्यानं बदली का होते? सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम असताना अधिकार्‍यांची सातत्यानं बदली करण्यात राजकीय मंडळींचाच हस्तक्षेप दिसून येत आहे.

 

दुसरीकडे असे अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत, ज्यांची अनेक वर्षे बदली केली जात नाही. त्यामुळे सरकारी नोकरीत असा दुजाभाव केला जातो, अशी विचारणा होत आहे. बदली होण्यापूर्वी संबंधित अधिकार्‍यानं घेतलेल्या चांगल्या निर्णयांची वाताहत लागते. परिणामी नागरिकांची गैरसोय होते.

 

बदलीचा प्रभावी कायदा हवाच !

 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी अधिकार्‍यांच्या बदलीची ही प्रक्रिया राबवायला सुरुवात केली होती. त्या प्रक्रियेचा अभ्यास विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत बदलीचा कायदा केला आहे.

 

दुर्दैवानं संबंधित सत्ताधारी मंडळी वरिष्ठ अधिकार्‍यांवर दबाव टाकून बदलीच्या या कायद्यातून पळवाटा काढून प्रामाणिकपणे आणि शिस्तबध्द काम करणार्‍या अधिकार्‍यांची मनमानीपध्दतीनं बदली करताहेत. त्यामुळे आगामी काळात बदलीच्या प्रभावी कायद्याची आणि त्या संभाव्य कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची खरी गरज निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :