‘या’ महापालिकेत राज्यशासनाचा महत्वपूर्ण निर्णय लागू!

spot_img

शासकीय सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सातव्या वेतनआयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा नगर विकास विभागाचा महत्वपूर्ण निर्णय लातूर महापालिकेत घेण्यात आलाय. दि. ६ डिसेंबर रोजी हा आदेश निर्गमित झालेला आहे.

लातूर महापालिकेची २९ आॅगस्ट रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. त्या सभेत ठराव क्रमांक ९८ नुसार काही शिफारशी करण्यात आल्या होत्या. या शिफारशीनुसार लातूर महापालिकेतल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अटी आणि शर्तींनुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

यातली एक अट अशी आहे, की
सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात येणाऱ्या राज्य शासनाकडील संबंधित समकक्ष पदांना लागू करण्यात आलेल्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक वेतनश्रेणी असणार नाहीत.

वेतनश्रेणीबाबत समकक्षता ठरविताना काही अडचणी आल्यास शासनाच्या पूर्व मान्यतेने निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 7 व्या वेतन आयोगाचा लाभ केवळ मंजूर पदांवरील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांनाच देण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत.

सातव्या वेतन आयोगानुसारच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणीकरता वाढीव आणि दायित्वासाठी शासनामार्फत कोणतेही स्वतंत्र अनुदान देय असणार नाहीत.

दरम्यान, सातवा वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात येणाऱ्या वेतनश्रेणीप्रमाणे वेतन सुधारित करुन प्रदानाची कार्यवाही शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून येणाऱ्या पुढील महिन्यांपासून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे लातूर महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :