‘या’ पठ्ठ्यानं एक कोटी रुपये खर्च केले ; पण अमेरिकेतून थेट भारतात चक्क कारनं आला !

spot_img

जसं हौसेला मोल नसतं, तसं जिद्दीलादेखील कुठलंच बोल नसतं. एखादी गोष्ट करायची म्हटलं आणि त्यासाठी जिद्द असली, की ती गोष्ट करण्यासाठी किंवा एखादं काम अस्तित्वात जाण्यासाठी वाटेल ते करायची तयारी असली की ते काम पूर्ण होतं, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. मूळच्या पंजाबचे असणारे काही दिवस तसेच रमले. मात्र नंतर ते भारतात जेव्हा आले तेव्हा इथे येण्यासाठी त्यांना तब्बल एक कोटी रुपये खर्च आला‌ वाचा सविस्तर त्यांच्या या प्रवासाची रंजक कहानी…!

थेट अमेरिकेहून भारतात येण्यासाठी कारने प्रवास करीत देश गाठण्याची ही किमया लखविंदर सिंह यांनी करून दाखवली आहे. सातासमुद्रापार जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. परंतु, त्यांनी रोडचा मार्ग निवडला आहे. हा मार्ग सर्वात जास्त आव्हानात्मक आहे. लखविंदर सिंह यांनी ५३ दिवसात २२ हजार किमी आणि २३ देशातून प्रवास करीत हे अंतर पूर्ण केले आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाहून भारतात येण्यासाठी लाइफस्टाइल पिकअप ट्रक टोयोटा टॅकोमाने प्रवास केला आहे. हा प्रवास रस्त्याने याच्यासाठी आव्हानात्मक होता. कारण, वेगवेगळ्या देशातून प्रवास करण्यासाठी विजा परमिट घेण्यासाठी मोठी अडचण येत होती.

५३ वर्ष असलेल्या लखविंदर सिंह यांचा हा रोमांचकारी प्रवासाचा व्हिडिओ Ride and Drive यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. यात लखविंदर यांनी आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितले आहे. मूळचे पंजाबमधील जालंधर येथील असलेले लखविंदर सिंह १९८५ मध्ये अमेरिकेला पोहोचले. तेव्हांपासून ते तेथेच राहतात.

आपल्या मातीशी नाळ जोडलेल्या व्यक्तीला जी ओढ असते. तीच ओढ लखविंदर सिंह यांना होती. यासाठी त्यांनी कॅलिफॉर्नियाहून आपला रस्त्यांनी प्रवास सुरू केला आहे. यावेळी त्यांना एक कोटी रुपयांहून जास्त खर्च आला आहे.

सर्वात पहिले लखविंदर यांची टोयोटा टॅकोमा समुद्रापार लंडनला पोहोचली. नंतर इंग्लिश चॅनेलहून रस्त्याने पॅरिसला पोहोचली. यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. ज्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, हंगरीहून तुर्की आणि नंतर पुन्हा मिडल वेस्ट कंट्री मधील ईराण हून पाकिस्तानात पोहोचली. पाकिस्तानहून नंतर भारतात पोहोचले.

सर्वात खास बाब म्हणजे २२ हून जास्त देशात या प्रवासात टोल टॅक्स किंवा अन्य खर्चासाठी त्यांनी क्रेडिट कार्डचा वापर केला आहे. अमेरिकेहून भारतात पोहोचण्यासाठी त्यांनी सर्बिया, तुर्की आणि पाकिस्तानात एकूण ४ जागी ओव्हरस्पीडिंग म्हणजे खूप वेगात वाहन चालवल्यामुळे त्यांना दंडसुद्धा भरावा लागलाय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :