या खासदार डॉ. अमोल कोल्हेंना काय झालंय राव? म्हणे, अमृता खानविलकरशी लग्न करणार! 

spot_img

या खासदार डॉ. अमोल कोल्हेंना काय झालंय राव? म्हणे, अमृता खानविलकरशी लग्न करणार! 

खासदार – अभिनेते अमोल कोल्हे सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत काही ना काही पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. मात्र सध्या त्यांनी अशी एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून एकच खळबळ माजली आहे.

यामध्ये अमोल कोल्हे अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत करणार लग्न असा उल्लेख करण्यात आला आहे. ही पोस्ट पाहून सर्वच चकित होत आहेत. पाहूया या पोस्टमागे नेमकं कारण काय आहे.

अभिनेते अमोल कोल्हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि अभिनय क्षेत्रातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. चाहतेही त्यांच्या पोस्टला भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी असं काही पोस्ट केलं आहे, जे पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.

अमोल कोल्हे यांनी एक वृत्त लिहिलेला फोटो शेअर केला आहे. या वृत्तामध्ये लिहलं आहे. ‘राष्ट्रवादीचे खासदार-अभिनेते अमोल कोल्हे पत्नीला कंटाळले आहेत. ‘वाजले की बारा’ फेम अमृता खानविलकरच्या प्रेमात ते पागल झाले आहेत.

लवकरच ते आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर आपल्या पतीला घटस्फोट देऊन विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे.

या लग्नाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न करुन मीही उपमुख्यमंत्री होईन कारण ‘अमृता हे नावच लकी आहे राजकरण्यांना’, असं या वृत्तात म्हटले आहे.

अमोल कोल्हे यांनी हे वृत्त शेअर करत लिहलंय, ”हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब! बायकोला आज 1 एप्रिल आहे, हे माहित होतं… नाही तर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती.

अर्थातच अमोल कोल्हे यांनी शेअर केलेलं हे वृत्त काही लोकांनी ‘एप्रिल फुल’ म्हणून केलं आहे. ज्याची माहिती स्वतः कोल्हेंनी देत मजेशीर कॅप्शन लिहलं आहे. अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताच सोशल मिडियावर सेलिब्रेटी आणि चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :