‘या कर्माचे फळ इथेच भोगायचंय’ ; ‘त्या’ व्हिडिओसंदर्भात गौतमी पाटीलची प्रतिक्रिया !

spot_img

‘या कर्माचे फळ इथेच भोगायचंय’ ; ‘त्या’ व्हिडिओसंदर्भात गौतमी पाटीलची प्रतिक्रिया !

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ मध्यंतरी सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेची दखल राज्य महिला आयोगानेदेखील घेतली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ गौतमी पाटीलनं स्वतः तिच्या आईला पाठवला होता.

एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलनं रडत रडतच हा प्रसंग सांगितला. ती म्हणाली ‘तो व्हिडिओ सर्वात प्रथम मी आईला पाठवला कारण दुसऱ्याकडून जर तो व्हिडिओ मिळाला असता तर तिला धक्का बसला असता. तो बसू नये म्हणून मी तिला तो व्हिडिओ पाठवला. ज्या कोणी हे कर्म केलं, त्या कर्माचे फळ त्याला इथेच भोगावं लागणार आहे’.

गौतमी पाटील पुढे म्हणाली, ‘हे असं कोणीही करू नये. कारण यामुळे समाजात असं करणाऱ्याची नुसती विकृती दिसते. जो हे करतो, त्याला याचा परिणाम लवकर भोगावा लागत नाही. मात्र ज्याच्याबद्दल हे केलं जातं, त्या व्यक्तीला त्याची किंमत मोजावी लागते. मला आयुष्यातील हा प्रयत्न होता’.

ती म्हणाली, ‘त्याला माझी प्रसिद्धी पाहावली नाही, की माझे शो बंद करायचे होते, नेमक्या काय कारणासाठी त्याने हा प्रकार केला, मला माहित नाही. पण यातून त्याची मानसिकता किती खराब आहे, हे दिसून येते, मी चुकले पण त्यानंतर नवी सुरुवात करण्यासाठी मी अगदी नवी साडी शिवण्यापासून तयारी केली, पण काहींना हे बघवलं नाही’.

‘जेव्हा हा व्हिडीओ समोर आला एक क्षण मला काय करावं कळत नव्हतं. पण मग मी आधी हा व्हिडीओ माझ्या आईलाच पाठवला. याचं कारण म्हणजे इतर कोणी तिला हा व्हिडीओ पाठवला असता तर ते बघून तिला सहन झालं नसतं म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मी स्वतः तिला हा व्हिडीओ पाठवला’.

आपल्याकडे संत महंतांनी सांगून ठेवलंय, की ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’. गौतमी पाटील एक नृत्य कलाकार आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन करणे, हे तिचं काम.

या कामाचे ती किती मानधन घेते, हा मुद्दा तसा गौण आहे. मात्र एका कलावंताची किंवा कलावंतीनीची कदर करण्याऐवजी तिच्या अन्नात माती कालवण्याचं पाप काही नराधम करत होते.

पुरोगामी महाराष्ट्राला हे नक्कीच शोभणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्रीचा आदर करावा, तिला मातेसमान वागणूक द्यावी, असं स्वतः कृतीतून दाखवून दिल. एवढा मोठा आदर्श डोळ्यासमोर असतानासुद्धा काही नालायक मंडळी गौतमी पाटीलचा कपडे बदलताना व्हिडिओ व्हायरल करतात. खरं तर महिलांचा जो अपमान होतो, त्यामध्ये हे जे उदाहरण आहे, ते खूप बोलकं उदाहरण आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :