‘या’ अभिनेत्याच्या मुलीच्या लग्नाचा २३ जानेवारीला उडणार बार !

spot_img

‘या’ अभिनेत्याच्या मुलीच्या लग्नाचा २३ जानेवारीला उडणार बार !

 

बॉलीवूडचा अण्णा म्हणून ज्या अभिनेत्याकडे पाहिले जाते त्या सुनील शेट्टीच्या मुलीचं अथिया शेट्टी आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू के. एल. राहुलच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. सोशल मिडियावर या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून अथिया आणि राहुलच्या लग्नाची चर्चा रंगली होती. ते केव्हा लग्न करणार, कुठे करणार याविषयी दोघांच्या सेलिब्रेटींना कमालीची उत्सुकता होती. आता सोशल मिडियावर झालेल्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

 

खंडाळ्याच्या बंगल्यात अथिया आणि राहुलचा शुभविवाह होणार असल्याचं बोललं जात आहे. त्या अलिशान बंगल्याचे फोटो व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जावईबापूंसाठी सासरे सुनील शेट्टी यांनी चांगलीच खबरदारी घेतल्याचे म्हटलं जातंय. त्या बंगल्याचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

खंडाळ्याच्या घाटातला तो बंगला हा एका फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा त्या बंगल्यात दोन्ही सेलिब्रेटी विवाहबद्ध होणार आहे. या महिन्याच्या शेवटी अथिया आणि राहुल लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. २३ जानेवारीला मोठा धुमधडाक्यात त्यांचे लगन होणार आहे.

 

लग्नानंतर राहुल जिथे राहणार आहे, ते घर रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या घरापासून जवळच आहे. त्यामुळे रणबीरचा शेजारी राहुल होणार आहे. खंडाळ्यातल्या सुनील शेट्टीच्या बंगल्यामध्ये मोठ्या जल्लोषात हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुनील शेट्टीचा तो बंगला भलताच सुंदर आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे.

 

सुनील शेट्टीच्या त्या बंगल्याचे काही व्हिडिओज हे युट्युबवर असून त्याला यापूर्वी नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नेटकऱ्यांनी सुनील शेट्टीच्या त्या बंगल्यावर कौतूकाचा वर्षावही केल्याचे दिसून येत आहे. सुंदर रंगसंगती, आल्हाददायी वातावरण, भरपूर सुर्यप्रकाश, आकर्षक मांडणी यामुळे तो बंगला चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :