मोबाईलच्या वापरानं पोरं बिघडली, वाया गेली, मोबाईलवर तासन् तास मोबाईलवर टाईमपास करणारी पोरं चार चौघांत मिसळत नाही, त्या पोरांच्या मनावर विपरित परिणाम होतो की काय, अशी भिती आणि तक्रारी आजच्या पालकांमध्ये व्यक्त होत आहे. मोबाईलमुळे जग माणसाजवळ आलं, पण माणसं एकमेकांपासून लांब गेल्याचं बोललं जात आहे.
(बातमी संदर्भात आपल्या कॉमेंट्स आम्हाला 9890006212 या whatsapp नंबर वर पाठवू शकता)
पण असं जरी असलं तरी केरळच्या एर्नाकुलममध्ये कुली अर्थात रात्रंदिवस हमालाचं करणार्या श्रीनाथ के यांनी मात्र हे सारं खोटं ठरवलंय. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सरकारकडून स्टेशनवर मोफत वायफाय मिळतं. याचा श्रीनाथ के यांनी सुयोग्य असा वापर केला.
श्रीनाथ के यांनी पुस्तकांवर पैसे खर्च करण्यापेक्षा स्मार्टफोन, इअरफोन आणि सिमकार्डवर खर्च केला. यातूनच त्यांचं UPSC उत्तीर्ण होण्याचं स्वप्न फलद्रूप झालं.
सन 2018 साली श्रीनाथ के हे 27 वर्षांचे असताना त्यांना एक मुलगी होती. तिच्या भवितव्यासाठी त्यांना खूप काही करायचं होतं. त्यावेळी त्यांनी रात्रंदिवस म्हणजे डबल शिफ्टमध्ये हमालाचं काम केलं.
सुरुवातीला श्रीनाथ यांनी राज्यातल्या केपीएससी परीक्षा पास केली. यानंतर यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि चार प्रयत्नांत UPSC क्रॅक केली. यासाठी त्यांनी सरकारकडून मिळणाऱ्या फ्री वायफायचा उपयोग केला.
सुरुवातीला श्रीनाथ यांनी राज्यातील केपीएससी परीक्षा पास केली. यानंतर यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि चार प्रयत्नात UPSC क्रॅक केली आणि यातूनच आपले UPSC पास होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
मोबाईलमुळे अभ्यास होत नाही, वेळ वाया जातो, मोबाईलमुळे लक्ष विचलित होतं, असं म्हटलं जाते. पण, या मोबाईलचा चांगला उपयोग केला, तर याच्यासारखी ज्ञान देणारी चांगली गोष्ट नाही.
मोबाईल फोनमुळे अनेकण बिघडल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण रेल्वे स्टेशनवर कुली अर्थात हमाल म्हणून काम करणारा तरुण मोबाईलमुळे थेट IAS अधिकारी बनलाय. हाच मोबाईल त्यांच्यासाठी पुस्तके, सिलॅबस, स्टडी मटेरियल आणि प्रॅक्टिस पेपर होते.
एखादा मोबाईलवर महत्वाचं काम करत असेल तर त्याच्याकडे बाकीच्या लोकांची जी पाहण्याची आणि त्याच्याबद्दल विचार करण्याची जी पध्दत केवळ एकतर्फी आहे. कारण मोबाईलवर तो जे काही करत असतो, याबद्दल त्यालाच माहित असतं. पण त्याला बाकीचे म्हणत असतात, ‘याला काही काम धाम आहे की नाही? जेव्हा पहावं तेव्हा मोबाईल खेळत असतो’. तर असं टोचून बोलणार्यांना श्रीनाथ के यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे समर्पक उत्तर दिलंय.