सतत मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे डोळे निकामी होतात. परिणामी बॅटिंग आणि बॉलिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा येतो. त्यासाठी मोबाईलचा अत्यंत कमी वापर करा आणि क्रिकेटकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, असं आवाहन राष्ट्रीय खेळाडू आणि माजी क्रिकेटपटू गोविंद मिसाळ यांनी केलंय.
अहमदनगरच्या डिफेन्स अकॅडमीच्यावतीनं दि. 16 ते 24 मे या कालावधीत गुलमोहर रोड परिसरातल्या आनंद विद्यालयाच्या प्रांगणात 14 वर्षीय वयोगटातल्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मिसाळ बोलत होते.
याप्रसंगी गणेश ठाकूर, प्रवीण अंतेपोलू, राजेंद्र चौधरी, अमोल घोलप, हंसराज रणधीर, संदीप घोडके (अध्यक्ष डिफेन्स अकॅडमी), हेड कोच प्रशांत अंतेपोलू, कॅप्टन रामकिसन शिंदे, विजय बरकसे, प्रतीक पवार आदी उपस्थित होते.
या क्रिकेट मॅच राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहेत. एका संघाला सहा मॅच खेळण्यास मिळणार आहेत. ज्या दोन संघाचे जास्त गुण होतील, त्या संघांमध्ये फायनल सामना होणार आहे. दिनांक 24 मे पर्यंत या मॅचेस चालणार आहेत. खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
एस सी चॅलेंजर्स, निखिल वॉरियर्स आणि हर्ष स्ट्रायकर्स या तीन संघांमध्ये ही क्रिकेट मॅच होणार आहे. विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या बक्षीसाचं स्वरूप स्मृतिचिन्ह असे आहे.