मोदी सरकार आता ‘ही’ कंपनी विकण्याच्या तयारीत ! रतन टाटा, Ratan TATA गौतम Gautam Adani अदानी हे आहेत ‘इंटरेस्टेड’!
सन 2021 – 22 या आर्थिक वर्षात ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल 28 हजार 215 कोटी आहे, ज्या कंपनीचा एक वर्षातला नफा 913 कोटी रुपये आहे, ती आरआयएनएल RINL ही कंपनी मोदी सरकार विकण्याच्या मनस्थितीत आहे. टाटा स्टील, TATA Steel अदानी ग्रुप Adani Group आणि जेएसडब्लू JSW या कंपन्या आरआयएनएल कंपनीचा हिस्सा विकत घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत.
दरम्यान, यासाठी डिसेंबरच्या सुरुवातीला निविदापूर्व सल्लामसलत बैठक पार पडल्याचं सूत्रांनी सांगितलंय. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनीही कंपनीच्या व्यवहाराला दुजोरा दिला आहे. या व्यवहाराची रचना तयार केली जात असल्याचं सांगून याबाबत अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दर्शविला.
अदानीच्या मालकीचं जे बंदर आहे, त्या बंदराजवळ आरआयएनएल कंपनीचा प्लाॅट आहे. या कंपनीकडे 22 हजार एकर जमीन आहे. बहुतेक नामांकित कंपन्या ती जमीन खरेदी करायला तयार आहेत. टाटा स्टील, अदानी ग्रुप, जेएसडब्लूसह सात कंपन्या आरआयएनएल कंपनीचा हिस्सा खरेदी करण्याच्या ‘मूड’मध्ये आहेत.
टाटा स्टीलचे सीईओ टी. व्ही. नरेंद्रन यांचं म्हणणं आहे, की त्यांची कंपनी आरआयएनएलचा प्लांट खरेदी करण्यास इच्छुक आहे. हा प्लांट किनारी भागात असून तो खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
मात्र समोर आलेल्या माहितीनुसार सध्या केंद्र सरकारला या कंपनीतील आपले संपूर्ण 100 टक्के स्टेक (company stake) एका झटक्यात विकायचे आहेत. परंतू ते मूल्यांकनावर अवलंबून आहे.
एवढा मोठा नफा आणि कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली आरआयएनएल RINL ही कंपनी केंद्रातल्या मोदी सरकारला का विकायचीय, या सरकारमध्ये सहभागी असलेल्या सत्ताधार्यांच्या डोक्यात हल्ली नक्की काय चाललंय, हे मात्र कळायला काहीही मार्ग नाही.
केंद्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?भारताची औद्योगिक भरभराट व्हावी, जगभरातल्या मोठमोठ्या नामांकित कंपन्यांची युनिट्स Unit’s या देशात येऊन तरुणांच्या हाताला काम मिळावं, भारत औद्योगिक क्षेत्रात बलशाली व्हावा, यासाठी प्रयत्न करायचे सोडून मोदी सरकार मोठमोठ्या आणि कोटयवधींचा नफा कमावणार्या कंपन्या विकण्याच्या का मागं लागलंय, केंद्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, अशी प्रश्नात्मक चर्चा देशात सध्या ऐकू येतेय.