मुस्लिम बांधवांच्या इज्तेमामध्ये वाहतुकीचं शिस्तबध्द दर्शन !

spot_img

मुस्लिम बांधवांच्या इज्तेमामध्ये वाहतुकीचं शिस्तबध्द दर्शन !

अहमदनगरच्या बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीतल्या मदरशामध्ये मुस्लिम बांधवांचा जो इज्तेमा आयोजित करण्यात आला होता, त्या इज्तेमाचा काल (दि. 17) समारोप झाला.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे 2-3 लाख मुस्लिम बांधव आल्याचा दावा केला जात आहे. मात्र एवढी मोठी गर्दी होऊनही नगरच्या वाहतुकीवर कुठलाही ताण आला नाही. या कार्यक्रमात शिस्तबध्द वाहतुकीचं दर्शन घडल्याचं बोललं जातंय.

या इज्तेमासाठी लाखोंच्या संख्येनं झालेली गर्दी, वाहनांची वर्दळ या सर्व पार्श्वभूमीवर नगरच्या वाहतुकीवर ताण आला नाही. यामागे मुस्लिम समाजातल्या युवकांनी वाहतुकीचं केलेलं सुयोग्य असं नियोजन ही एक चांगली बाब नगरकरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहायला मिळाली.

इज्तेमाचा हा कार्यक्रम ज्याठिकाणी होता, त्या बाराबाभळीपासून विजयनगर चौक, पंचशीलनगर चौक, भिंगार वेस, भिंगार अर्बन बँक चौक, भिंगार नाला फाटा, बेलेश्लर मंदीर परिसर, गोविंदपूरा फाटा, स्टेट बँक चौक, कोठला स्टँड चौक, एस.पी.ऑफिस चौक आदी  ठिकाणी मुस्लिम समाजाच्या युवकांनी स्वयंसेवकाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली.

वाहतुकीचे नियोजन करताना रुग्णवाहिकेला (Ambulance) रस्ता मोकळा करून देणे, महिला, वृद्ध, लहान मुलांचे वाहतूक करताना विशेष काळजी घेतली गेली, अवजड वाहने ट्रॅफिक मधून तात्काळ काढून देण्याचे काम या स्वयंसेवकांनी उत्तम पणे केल्याचे दिसून आले.

मुस्लिम समाजातल्या शेकडो युवकांनी वाहतुकीचं जे शिस्तबध्द दर्शन घडवलं, त्या कामकाजाचं सर्वत्र कौतूक होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांच्या बरोबरीनं या युवकांनी वाहतूक नियंत्रणाचं काम केलं.

मुस्लिम समाज बांधवांच्या ऐक्याची भावना सर्वश्रुत आहे. या इज्तेमासाठी मोठी गर्दी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं होतं. खरोखरंच लाखो मुस्लिम समाज बांधवांची अलोट गर्दी होऊनही वाहतूक कोंडीची कुठलीही समस्या उपस्थित झाली नाही. याचं संपूर्ण श्रेय या कार्यक्रमाच्या आयोजकांसह वाहतूक नियंत्रण करणार्‍या मुस्लिम समाजातल्या स्वयंसेवकांचं यानिमित्तानं कौतूक केलं जात आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :