मुंबईत तरुण शेजारच्या मुलीला पाठवायचा सेक्स टाॅयचा भेटवस्तु, हैराण करणार कारण 

spot_img

मुंबईत तरुण शेजारच्या मुलीला पाठवायचा सेक्स टाॅयचा भेटवस्तु, हैराण करणार कारण

मुंबई : मुंबईतील मालाड सायबर सेलने राहुन गंगावने (वय 22)नावाच्या एका एकतर्फी प्रेमीला मालाडमधील लिबर्टी गार्डनमधुन अटक केली आहे.हा तरुण शेजारी राहणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता.प्रेमात नकार मिळाल्यानंतर हा तरुण तिला वारंवार सेक्स टॉप पाठवित होता आणि तिचा मोबाइल नंबर पॉर्न साइटवर टाकला होता.या प्रकरणात विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर मालाड पोलिसांनी विनयभंगाचा प्रयत्न आणि आयटी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

प्रप्रोज केल्यानंतर मिळाला होता नकार

या प्रकरणात मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीसांनी सांगितलं की,पीडिता २० वर्षाीय विद्यार्थिनी आहे.ती आरोपीच्या घराजवळ राहते.एकाच भागात राहत असल्याने ते एकमेकांना थोडंफार ओळखत होते.यातच आरोपीने तिच्याकडुन मोबाइल नंबर घेतला होता.राहुलने यापुर्वी तिला प्रप्रोज करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र विद्यार्थिनीने त्याला नकार दिला.

 

यानंतर राहुलने तरुणीचा मोबाइल नंबर पोर्न साइटवर शेअर केला.त्यानंतर विद्यार्थिनीला वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल येऊ लागले.याशिवाय राहुल पीडिताचा नंबर सेक्स टॉय विकणाऱ्या कंपनीला देऊन तिच्या घरी सेक्स टॉयची कॅश ऑन डिलिव्हरी करवत होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडितेच्या घरी अनेकदा सेक्स टॉयचं कुरिअर आलं होतं.सुरुवातीला जेव्हा तिला पार्सल उघडुन पाहिलं तर त्यात सेक्स टॉय होतं.याबाबत पीडितेने ऑक्टोबर महिन्यात मालाड पोलिसात तक्रार दाखल केली होती.यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.त्याला सोमवारपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :