‘मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचं मला माहित नाही ! शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया !
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपडे न घालण्यावरुन राज्यात नुसतंच बिनकामाची आदळआपट सुरु आहे. या विषयात सामान्य जनतेचा ना फायदा ना कोणाचं समाज प्रबोधन. पण राज्यातले सर्वच प्रश्न संपले आणि हा एवढा एकच प्रश्न प्रलंबित आहे, अशा थाटात राज्यात सारं काही सुरु आहे.
महाराष्ट्राला मोठी आणि श्रेष्ठ अशी साधू – संतांची, युग पुरुषांठी परंपरा आहे. त्यामुळे पाश्चात्यांप्रमाणं कोणी उघडं नागडं फिरत असेल (वेडसर, मनोरुग्ण सोडून) तर त्याला सूज्ञ आणि बुध्दीमान व्यक्तींचा आक्षेप हा असतोच.
सार्वजनिक ठिकाणी कपडे न घालता किंवा कमी कपडे घालून फिरत असलेल्या उर्फी जावेदच्या या मुद्द्यावरुन राज्यात सध्या नुसतेच आरोप प्रत्यारोप आणि क्रिया प्रतिक्रियांचं वादळ घोंगावत आहे. भाजपच्या चित्रा वाघ, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्यातलं हे शित युध्द थांबता थांबेना.
विशेष म्हणजे प्रिंट मिडिया, इलेक्ट्राॅनिक मिडिया आणि सोशल मिडियानं या विषयाला इतकं प्राधान्य दिलं, की जो जो राजकीय नेता किंवा महिला नेत्या भेटतील, त्या प्रत्येकांना उर्फी जावेदच्या कपड्यांवरुनच पत्रकारांकडून प्रश्न विचारले जात आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनादेखील पत्रकारांनी विचारलं, की उर्फी जावेद यांच्या कपड्यांवरुन तुम्हाला काय वाटतं? शर्मिला ठाकरे यांनी मात्र या प्रश्नाचं अवघ्या दोन वाक्यांत उत्तर दिलं.
अर्थात शर्मिला ठाकरे यांनी या विषयाला कवडीइतकंदेखील महत्व दिलं नाही. त्यामुळे हा विषय आपण एखाद्या फेकून दिलेल्या च्युईंगमसारखा नाहक चघळत आहोत, अशी पश्चात्तापाची भावना कदाचित पत्रकारांची झाली असावी.
शर्मिला ठाकरे यांना जेव्हा हा प्रश्न विचारला, की ‘तुम्हाला उर्फी जावेद यांच्या कपड्याबाबत काय वाटतं? तर त्या म्हणाल्या, ‘मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचं मला माहित नाही’.
शर्मिला ठाकरे यांच्या या त्रोटक उत्तरानं स्पष्ट होतंय, की या बाष्कळ विषयाला कितपत महत्व द्यायचं? एखादा विषय दीर्घ काळ चर्चिला गेरा आणि त्यातून काहीही निष्पन्न होणार नसंल तर त्याकडे दुर्लक्ष केलेलं कधीही योग्य, हाच संदेश तर शर्मिला ठाकरे यांना इतरांना द्यायचा नाही ना?