मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का ? तर मग ही माहिती वाचा आणि करा अर्ज… ! 

spot_img

मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का ? तर मग ही माहिती वाचा आणि करा अर्ज… ! 

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत वेगवेगळ्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे त्यामुळे सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही फार मोठी चांगली संधी चालून आली आहे ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज करण्यास हरकत नाही.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा 2022 या पदासाठी तब्बल 114 जागा भरण्यात येणार आहेत इच्छुकाने या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठीची अर्ज प्रक्रिया दिनांक 24 मे पासून सुरू होणार असून दिनांक 13 जून पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता अशी आहे विधी शाखेतली वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता, विधी शाखेची पदवी सेवा कर्मचारी. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 पासून 50 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यासाठी करावयाच्या अर्जाचे शुल्क खुल्या वर्गासाठी 394 रुपये तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग आदींसाठी 294 रुपये अर्जाचा शुल्क राहणार आहे. यासाठी अधिक माहिती हवी असल्यास http://mpsc.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान यासाठी वेतन म्हणजे पगार पुढील प्रमाणे असणार आहे नवीन विधी अधिकारी – रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते. वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता – रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.

सेवा कर्मचारी – रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :