मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? ‘या’ लक्झरी कार्सच्या किंमती वाढणार आहेत?

spot_img

आगामी जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच टाटा, TATA मर्सिडीज Mercedes आणि आॅडी Audi या लक्झरी कार्स कंपन्यांनी त्यांच्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता केंद्रानं ईव्ही वाहनांच्या विक्रीला प्रोत्सासन दिलंय.

 

दरम्यान, बॅटर्‍यांच्या वाढत्या किंमतीचा परिणाम इलेक्ट्रिक वाहनांवर Electric Vheical होणार आहे. या वाहनांच्या किंमतीमध्ये 7 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या ज्या इलेक्ट्रिक वाहनाची किंमत 20 लाख रुपये असेल तर यानंतर त्या वाहनांसाठी तुम्हाहा 22 लाख रुपये खर्चावे लागणार आहेत.

 

अर्थात या महागाईची झळ फक्त सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना सहन करावी लागणार आहे. मात्र ज्यांनी अवैध मार्गानं बेहिशोबी मालमत्ता जमविली आहे, अशा लोकांना या वाढत्या महागाईचा अजिबात फटका बसणार नाही, हे मात्र उघड सत्य आहे.

 

ज्यांचं वार्षिक उत्पन्न मोजकं किंवा जेमतेम आहे, अशा मध्यमवर्गीय लोकांना लक्झरी कार्स घेण्यासाठी बँकेकडून कर्ज Vaical Loan घ्यावं लागतं. या वाहन कर्जाचे हप्ते EMI जास्त असल्यानं मध्यमवर्गीयांच्या इतर खर्चावर मर्यादा येतात. मात्र त्या हे सारं सहन करुन मध्यमवर्गीय वाहनांची हौस भागवून घेतात.

 

मध्यमवर्गियांना वाहन गरज म्हणून हवं असते. बेकायदेशीर मार्गाने बेहिशोबी मालमत्ता जमविणार्‍या लोकांसाठी अलिशान कार्स म्हणजे त्यांचं ऐश्वर्य असतात. म्हणूनच असे बेकायदेशीर काम करणारे किंवा वाममार्गानं पैसा कमविणारे त्यांच्या अलिशान बंगल्यासमोर नामांकित कंपन्यांच्या लक्झरी कार्स उभ्या करतात.

 

काही शौकिन आणि अतिश्रीमंत मंडळी बाजारात कारचं नवं माॅडेल आलं, की लगेच ती खरेदी करतात. अशा लोकांना कार्सच्या वाढलेल्या किंमती किंवा इंधनवाढीची चिंता अजिबात सतावत नाही. मात्र मध्यमवर्गियांना नवी कार खरेदीसाठी अनेकवेळा विचार करावा लागतो. हा या दोन्ही वर्गातल्या लोकांमध्ये फरक आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :