महिला सरपंच राहिली फक्त कागदावरच ! पतीच करतो सरपंच पत्नीच्या सह्या ! संभाजीनगरमधला प्रकार उघडकीस !

spot_img

महिला सरपंच राहिली फक्त कागदावरच ! पतीच करतो सरपंच पत्नीच्या सह्या ! संभाजीनगरमधला प्रकार उघडकीस !

महिलांना राजकारणात 50 टक्के आरक्षण मिळाले असले तरी महिला ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीने पाहतात किंबहूना त्या महिलांचे पतीच सर्व काही कारभार कसा पाहत असतात, हे अनेकदा समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाचा पतीच पत्नीच्या सर्वच कागदपत्रांवर अगदी चेकवरसुद्धा सह्या करून चेक पास करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात पाच हजार लोकसंख्या असलेली गाजगाव ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची 2021 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत आशाबाई तुळशीराम धुमाळ यांची गावाच्या सरपंचपदी निवड झाली. मात्र आशाबाई या सरपंचपदी निवड झाल्यापासून त्यांचा सर्व कारभार त्यांचे पती तुळशीराम धुमाळ हेच पाहत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

एवढंच नाही तर तुळशीराम धुमाळ यांच्या सततच्या हस्तक्षेपाला कंटाळून गावकऱ्यांनी त्यांचे थेट ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. तसेच याबाबत कारवाईची देखील मागणी केली जात आहे. ग्रामपंचायतच्या विकासकामांसाठी शासनाकडून निधी दिला जातो. तर ग्रामपंचायत स्तरावर संबंधित लोकांना कामे देऊन करुन घेतली जाते. परंतु झालेल्या कामाचे बिल अदा करण्यासाठी किंवा ग्रामपंचायतचे कोणतेही पेमंट देण्यासाठी चेकवर ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या सह्या लागतात.

गाजगाव येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच असलेल्या आशाबाई तुळशीराम धुमाळ यांच्या जागी त्यांचे पती तुळशीराम धुमाळ हेच सह्या करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महिलांना ग्रामपंचायत आरक्षण मिळूनदेखील अधिकार मात्र अजूनही मिळाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :